डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक? वाढीव मुदत देण्यास हायकोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 06:02 PM2017-12-19T18:02:59+5:302017-12-19T18:30:25+5:30

पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.  गुंतवणूकदारांचे 50 कोटी रुपये भरण्याची वाढीव मुदत देण्यास मुंबई हायकोर्टाने मंगळवारी नकार दिला आहे. 

The High Court rejects the arrest of the DSK at any time, for extension of the term | डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक? वाढीव मुदत देण्यास हायकोर्टाचा नकार

डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक? वाढीव मुदत देण्यास हायकोर्टाचा नकार

googlenewsNext
ठळक मुद्देडी. एस. कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वाढीव मुदत देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार19 डिसेंबरपर्यंत 50 कोटी रुपये महानिबंधकांकडे जमा करण्याचे दिले होते आदेश

मुंबई :  पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.  गुंतवणूकदारांचे 50 कोटी रुपये भरण्याची वाढीव मुदत देण्यास मुंबई हायकोर्टाने मंगळवारी नकार दिला आहे. 
गेल्या 15 दिवसांपूर्वी डी.एस. कुलकर्णी यांना 50 कोटी रुपये जमा करण्याची मुदत वाढ मुंबई हायकोर्टाने दिली होती. ही मुदत आज संपली असून डी.एस. कुलकर्णी यांनी आणखी काही दिवस मुदत वाढ मिळावी यासाठी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. मात्र, या अर्जावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता डी. एस. कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 
दरम्यान, 19 डिसेंबरपर्यंत 50 कोटी रुपये महानिबंधकांकडे जमा करण्याची तयारी डी. एस. कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टात दर्शवली होती. मात्र या कालावधीवर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला होता. डी. एस. कुलकर्णी जास्त दिवस मुदत मागत आहेत, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात म्हटले होते. त्याचवेळी डी.एस. कुलकर्णी यांचे वकील अशोक मुंदर्गी यांनी एवढ्या दिवसांत 50 कोटी रुपये जमा करण्याची हमी न्यायालयाला दिली. त्यामुळे न्या. अजय गडकरी यांनी डी. एस. कुलकर्णी यांना अटकेपासून तुर्तास दिलासा दिला होता. तसेच दिलेल्या अवधीत पैसे जमा करा असे सांगतानाच, पैसे भरले नाहीत, तर अटकपूर्व जामिनासाठी येऊ नका, असेही न्यायालयाने डी. एस. कुलकर्णी यांना बजावले होते. 

Web Title: The High Court rejects the arrest of the DSK at any time, for extension of the term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.