शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

महिलेच्या ई-मेलनंतर मुंबईसह तीन विमानतळांवर हायअ‍ॅलर्ट

By admin | Published: April 17, 2017 3:28 AM

विमान अपहरणाच्या शक्यतेची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, मुंबईसह चेन्नई व हैदराबाद विमानतळांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

मुंबई/नवी दिल्ली : विमान अपहरणाच्या शक्यतेची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, मुंबईसह चेन्नई व हैदराबाद विमानतळांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. २३ जणांच्या एका टीमकडून या विमानतळावरील विमानाचे अपहरण होऊ शकते, असा ई-मेल एका महिलने मुंबई पोलिसांना पाठवल्यानंतर, तिन्ही विमानतळांवर हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. विमानतळाच्या सुरक्षेशी संबंधित समन्वय समितीची बैठकही घेण्यात आली आहे. या तीन विमानतळांवर सुरक्षेच्या बाबतीत अधिक काळजी घेण्यात येत आहे. चेक इन आणि सुरक्षेशी संबंधित इतर प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका महिलेने ई-मेल करून यासंबंधीची माहिती मुंबई पोलिसांना कळविली आहे. त्यानंतर, युद्धपातळीवर सतर्कता बाळगली जात आहे. सहा तरुणांची मुंबई, चेन्नई व हैदराबाद येथून विमान ‘हायजॅक’ करण्यासंबंधी चर्चा सुरू होती, अशी माहिती या महिलेने पोलिसांना दिली आहे. त्याबाबतची सत्यता पडताळली जात आहेत. तीन विमानतळांवर योग्य खबरदारी घेण्यात आल्याचे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयआरएफ) महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तिन्ही विमानळावरून एकाच वेळी विमानाचे अपहरण केले जाईल. त्यासाठी एकूण २३ जणांचे पथक कार्यरत आहे. अपहरण करून हल्ला घडविण्याचा त्यांचा कट असल्याचे त्यांच्या बोलण्यातून समजले, अशी माहिती संबंधित महिलेने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे विमानतळासह मुंबईतील सर्व प्रमुख ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्याबाबत स्थानिक पोलिसांनाही खबरदारी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.