- लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तुम्हालाच केसमध्ये अडकवेन, अशी भीती घालून दीड हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या परभणीच्या सत्र न्यायालयातील अपर शासकीय अभियोक्ता नामदेव घुगे यांना न्यायालयाने दीड वर्षाच्या कारावासाची शिक्षा व ६ हजार रुपये दंड ठोठावला आहे़नामदेव घुगे व त्याचे सहकारी बळीराम आबाजी बुधवंत हे दीड हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) २७ जानेवारी २००९ रोजी आली होती़ यानुसार, एसीबीने सापळा लावला आणि दोघांनाही लाच स्वीकारताना पकडले. या प्रकरणी विशेष न्यायालयाचे न्या़ आर. एम. सादरानी घुगे यास कलम ७ अंतर्गत १ हजार रुपये दंड, तसेच कलम १३ (२) अंतर्गत एक वर्ष, सहा महिन्यांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली़, तसेच बळीराम बुधवंत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली़