शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

अधिक दरआकारणी पडणार महागात

By admin | Published: June 26, 2016 4:24 AM

छापील किमतीपेक्षा (एमआरपी) जास्त दराने पॅकबंद पाण्याची बाटली व शीतपेये विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात वैध मापन शास्त्र विभागाने कारवाईचा बडगा उभारला आहे.

मुंबई : छापील किमतीपेक्षा (एमआरपी) जास्त दराने पॅकबंद पाण्याची बाटली व शीतपेये विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात वैध मापन शास्त्र विभागाने कारवाईचा बडगा उभारला आहे. या विभागाने नुकत्याच हाती घेतलेल्या विशेष मोहिमेंतर्गत २५६ आस्थापनांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. भविष्यात ही मोहीम आॅनलाइन पद्धतीने अधिक सक्रिय करण्याचा या विभागाचा मानस आहे.छापील किमतीपेक्षा जास्त दराने पॅकबंद पाण्याची बाटली व शीतपेये विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या राज्यातील विविध सिनेमागृहे, मॉल, रेल्वे व बस स्थानके, फूड मॉल, हॉटेल यांच्यावर वैध मापन शास्त्र यंत्रणेने कारवाई केली आहे. वैध मापन शास्त्र विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीमध्ये पॅकबंद पाण्याच्या बाटलीची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या २३३, छापील किमतीत खाडाखोड केल्याप्रकरणी ३, आवश्यक माहिती न छापणाऱ्या ९, विहित आकारमानात माहिती न दिलेल्या १ व इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० अशा एकूण १५६ आस्थापनांवर कारवाई केली.पॅकबंद वस्तूंची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी यंत्रणेकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन राज्यात विविध ठिकाणी तपासणी करण्याचे आदेश वैध मापन शास्त्र नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. (प्रतिनिधी)कायदा काय सांगतो?वैध मापन शास्त्र कायद्यानुसार कोणतीही वस्तू त्यावर छापलेल्या किमतीपेक्षा जादा दराने विक्री करता येत नाही. जर कोणी तसे करीत असेल, तर त्याच्यावर दंडात्मक, प्रसंगी शिक्षेची कारवाई होऊ शकते. दोषी आढळल्यास प्रारंभी संबंधित विक्रेत्यावर ५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तोच गुन्हा पुन्हा केल्यास दुप्पट दंडाची आकारणी होऊ शकते. त्यानंतरही जादा अधिभार आकारल्यास शिक्षादेखील होऊ शकते. ग्राहकाने पावती मागूनही न दिल्यास संबंधितांवर जादा अधिभार घेणे आणि पावती न देणे असे दोन गुन्हे दाखल होतात.येथे करा तक्रार !पॅकबंद वस्तूंची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करण्यात येत असल्याचे आढळून आल्यास त्याविरुद्ध वैध मापन यंत्रणेच्या नियंत्रण कक्ष क्रमांक ०२२-२२८८६६६६ आणि व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ९८६९६९१६६६ या क्रमांकांवर तक्रार करता येईल.सोशल मीडियावरही तक्रार कराछापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करण्याच्या घटना आढळून आल्यास विभागाच्या ईमेल आयडीवर dclmms_comlaints@yahoo.com तसेच यंत्रणेच्या फेसबुक पेज (Legal Metrology Maharashtra Consumer grievances) या ठिकाणी तक्रार करा.शीतपेयावर जादा अधिभार घेणे हे कायद्याच्या विरोधात आहे. विभागातर्फे नियमित तपासणी सुरू असली तरीही नागरिकांना असा प्रकार कोठे आढळल्यास त्याबाबत त्वरित संपर्क साधावा. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - अमिताभ गुप्ता, वैध मापन शास्त्र नियंत्रकछापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्यांविरोधात ग्राहक पंचायत आणि वैध मापन शास्त्र विभागाने यापूर्वीही संयुक्त मोहीम राबविली होती. त्या माध्यमातूनही अनेक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता ही मोहीम वैध मापन शास्त्र विभाग राबवित आहे. आणि ग्राहक पंचायतीद्वारे घेण्यात येणाऱ्या ग्राहक प्रशिक्षण शिबिर, कार्यशाळांद्वारे याविषयी ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात येते. ग्राहक पंचायतीकडेही अशा प्रकारच्या तक्रारी येतात, त्या ग्राहकांना आम्ही वैध मापन शास्त्र विभागाकडे दाद मागण्यासाठी मार्गदर्शन करतो.- अ‍ॅड. शिरीष देशपांडे, कार्याध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत