- ओमकार गावंड
मुंबई : यंदा डिसेंबर संपण्याआधीच मुंबईतील घर खरेदीमार्फत मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत ६०० कोटींपेक्षा अधिक महसूल जमा झाला आहे. मुद्रांक शुल्कात देण्यात आलेल्या सवलतीच्या समाप्तीनंतर पहिल्यांदाच ६०० कोटींपेक्षा अधिक महसूल जमा झाला आहे.गेल्या दहा वर्षांमध्ये प्रथमच या वर्षी मुंबईत मालमत्ता विक्रीने एक लाख घरांचा आकडा पार केला आहे. कोरोनाच्या संकटातून बांधकाम क्षेत्र सावरण्यासाठी सरकारने १ सप्टेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ दरम्यान मुद्रांक शुल्कात अनुक्रमे २ ते ३ टक्क्यांनी सवलत दिल्यामुळे सवलतीच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये मुंबईत सर्वाधिक घर खरेदी झाली. त्यामुळे या महिन्यात एकूण ८७५ कोटी रुपये महसूल जमा झाला होता. त्यानंतर कोणत्याच महिन्यात ६०० कोटींपेक्षा अधिक महसूल जमा झाला नव्हता; परंतु यंदाच्या २६ डिसेंबरपर्यंत मुंबईत ७,७०७ घरांची खरेदी झाली असून त्यातून ६०० कोटींपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे.
महिना घरखरेदी महसूल (कोटींत)जानेवारी १०,४१२ ३०५ फेब्रुवारी १०,७१२ ३५२मार्च १७,४४९ ८७५ एप्रिल १०,१३६ ५१४मे ५,३६० २६९जून ७,८५७ ४२०जुलै ९,०३७ ५६७ऑगस्ट ६,७८४ ४२१सप्टेंबर ७,८०४ ५२९ऑक्टोबर ८,५७६ ५५०नोव्हेंबर ७,५८२ ५४९डिसेंबर २६ पर्यंत ७,७०७ ६००
- परवडणाऱ्या घरांची उपलब्धता, गृहकर्जावरील घटलेले व्याजदर, नवीन प्रकल्प लॉन्च होण्यात झालेली वाढ, विकासकांच्या आकर्षक ऑफर्स घर खरेदीदारांना आकर्षित करीत आहेत. अलीकडे मुंबईत मालमत्ता खरेदीचे कोट्यवधींचे व्यवहार पार पडल्याने महसूल चांगला मिळाला आहे.
- मुंबईत मालमत्ता विक्रीने या वर्षी एक लाख घरांचा आकडा पार केला आहे.