पुणे : रायगडमधील भिरा येथे मंगळवारी देशातील सर्वाधिक कमाल ४६़५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती़ तेथून आजूबाजूचे तापमान कमी असताना, भिरा येथे इतक्या तापमानाची नोंद झाल्याने हवामान शास्त्रज्ञही चकित झाले आहेत़ पूर्वीच्या हवामान विभागाकडील नोंदी पाहिल्यास अगदी ४९ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाची नोंद झाल्याचे आढळून आले आहे़२७ एप्रिल २००५ रोजी भिरा येथील कमाल तापमान ४९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याची नोंद झाली आहे़ पुणे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अरविंदकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, भिरा येथे देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे़ तेथील नोंदणी करणाऱ्या साहित्यांचे परीक्षण करण्याची सूचना आम्ही मुंबईच्या वेधशाळेतील अधिकाऱ्यांना केली आहे. नोंद घेताना काही तांत्रिक चूक झाली का, याची तपासणी केल्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य राहील़ (प्रतिनिधी)
रायगडमधील ‘भिरा’ येथे देशातील सर्वाधिक तापमान
By admin | Published: March 30, 2017 4:45 AM