शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

‘जीवनदायी योजने’अंतर्गत कामोठेत सर्वाधिक उपचार

By admin | Published: April 06, 2017 2:38 AM

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंर्तगत २०१२-१७ या कालावधीत तब्बल चार हजार ५२३ रुग्णांवर सात हजार ९२७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत

आविष्कार देसाई,अलिबाग- रायगड जिल्ह्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत २०१२-१७ या कालावधीत तब्बल चार हजार ५२३ रुग्णांवर सात हजार ९२७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यासाठी सरकारने भरघोस असे २१ कोटी ३० लाख रु पये खर्च केले आहेत. राजीव गांधी योजनेंर्तगत कामोठे येथील एमजीएम रु ग्णालयात सर्वाधिक उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे हे रुग्णालय रुग्णांसाठी खरोखरच जीवनदायी ठरले आहे.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेला रायगड जिल्ह्यात नोव्हेंबर २०१४ मध्ये योजनेची सुरुवात झाली. ८ आॅगस्टला २०१४ रोजी नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि सरकार यांच्यामध्ये त्याबाबतचा करार झाला आहे. ज्या नागरिकांकडे पिवळी, केशरी, अंत्योदय योजनेतील रेशन कार्डेआहेत, त्या सर्वांच्या विम्याची रक्कम केंद्र सरकार भरते. कार्डावर ज्यांची नावे आहेत ते या उपचार खर्चास पात्र ठरतात. दीड लाख रुपयांपर्यंत ही मर्यादा असली तरी किडनीवरील उपचार खर्चासाठी अडीच लाख रुपयापर्यंत रक्कम वाढविण्यात आली आहे.राज्यात पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर मुंबई, रायगड, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांत ही योजना सुरू झाली. या योजनेअंतर्गत सरकारने वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न आणि रेशन कार्ड असलेल्या कुटुंबाची माहिती एकत्रित केलेली आहे. त्या कुटुंबाचा आरोग्य विमा सरकारने रक्कम भरून उतरविला आहे. सध्या मोठ्या रु ग्णालयात ज्यांनी आरोग्य विमा उतरवला आहे, त्यांच्यावर कॅशलेस उपचार होतात. पण बहुतेक गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांनी अद्याप विमा उतरविला नाही. त्यामुळे ते उपचाराच्या खर्चाच्या भीतीने मोठ्या खासगी रुग्णालयात जाऊ शकत नाहीत.