लोकमत न्यूज नेटवर्कमनोर : बडोदा मुंबई दृतगती महामार्गच्या मोजणीच्या कामाला शेतकरी संघर्ष समिती व शेतकऱ्यांनी विरोध केला तरी महसूल व भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात मोजणीला सरूवात केली आहे. त्यामुळे शेतकरी प्रकल्पाच्या विरोधात संताप व्यक्त करत आहे. मात्र, नेमलेल्या अधिकाऱ्यांना त्यांची अरेरावी व उध्दट भाषा ऐकावी लागत आहे.पालघर तालुक्यातील पूर्व भागात २७ गावे येत असून येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन काही घरे दृतगति महामार्गामध्ये जाणार असल्याने काही शेतकरी भूमीहीन होणार आहेत. तसेच आता पर्यंत शासनाने अनेक प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना आश्वासने देऊन त्यांची फसवणूक केली आहे. अकरपट्टी, पोफरण येथील त्याचे घरे जमिनी ताब्यात घेतले त्यांना निकृष्ठ घरे दिले. काहींना आता पर्यंत शेत जमीन मिळालेली नाही. ते सबंधित विभागाचे कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. तसेच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गामध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी आंदोलने करावे लागत आहेत. असे अनेक प्रकल्प राबविण्यात आले मात्र शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. म्हणून नागझरी, लालोंढे, चिंचारे, काटले, नीहे, खांब्लॉली, साखरे नावझे असे अनेक गावातील शेतकऱ्यांचा रस्त्यासाठी जमीन देण्यास प्रखर विरोध होत आहे.>अधिकाऱ्यांना अरेतुरे ची भाषा अन् शिवीगाळजमीन मोजणीसाठी सुरवात झाली आहे पोलिसांच्या बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे. मंडळ अधिकारी, तलाठी, भूमिअभिलेख भूमाकर व प्रकल्प अधिकारी यांच्या उपस्थितीत काम सुरु आहे. मंडळ अधिकारी बर्वे म्हणाले की, आम्ही शासनाचे नोकर आहोत. तेथून जे आदेश येतील त्या प्रमाणे आम्हास काम करावे लागते. आमचे गावकरी व शेतकऱ्यांबरोबर वैयक्तिक शत्रुत्व नाही. मग आम्हाला आरे तुरेची भाषा, शिवीगाळ काही लोकांकडून केली जाते हे योगय नाही.
हायवेच्या मोजणीचे काम बंदोबस्तात सुरू
By admin | Published: May 14, 2017 2:29 AM