शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
5
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
6
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
7
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
8
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
9
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
12
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
13
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
14
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
15
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
16
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
17
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
18
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
19
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
20
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

हायवे झाले दारूमुक्त

By admin | Published: April 02, 2017 3:17 AM

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील हायवेवरील दारूची दुकाने, तसेच बार, पब आणि दारू विक्री करणारी रेस्टॉरंटस शनिवारी सकाळपासूनच बंद व्हायला सुरुवात झाली

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील हायवेवरील दारूची दुकाने, तसेच बार, पब आणि दारू विक्री करणारी रेस्टॉरंटस शनिवारी सकाळपासूनच बंद व्हायला सुरुवात झाली. काही ठिकाणी बार व दुकानमालकांनी स्वत:हूनच सकाळी दुकाने उघडली नाहीत, तर राज्याच्या बऱ्याच भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली.विदर्भात महामार्गांवरील २,१२६ दारूची दुकाने बंद झाली असून, नागपूर जिल्ह्यातील ८७१ परमिट रूम, बार, विदेशी व देशी दारूची दुकाने आणि बीअर शॉपींना सील ठोकण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात सुमारे ४०० दारू दुकाने बंद करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील २४९ पैकी २१९ दुकाने बंद झाली. बुलडाणा जिल्ह्यातील ३६१, वाशिम जिल्ह्यातील १६२ आणि अकोला जिल्ह्यातील २२१ दुकानांना टाळे लावण्यात आले वा मालकांनी स्वत:च ती बंद ठेवली. जवळपास १४ अधिकाऱ्यांसह ५० जणांच्या चमूने शनिवारी विदर्भात कारवाई केली. चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदीच आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ८८७ दुकानांना टाळे लावण्यात आले. सांगली जिल्ह्यातील ६२४ दुकाने बंद झाली. सातारा जिल्ह्यातील दुकानेही बंद होती. सोलापूर जिल्ह्यातील ८९५ पैकी तब्बल ६४६ बार, रेस्टॉरण्टस व दुकानांना टाळे ठोकण्यात आले़ यापैकी ५२३ दुकाने सोलापूर शहरातील आहेत़ पुणे शहरानजीकची जवळपास ८० टक्के दारूची दुकाने बंद झाली. शहरात महामार्गांलगत १९५० बार असून, जवळपास पाचशे वाइन्स शॉप आहेत. त्यातील केवळ २० टक्केच आता सुरू राहणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी दिली. कोकणातील दुकानेही सील करण्यात आली. रत्नागिरीतील २९४ तर सिंधुदुर्गात २३२ दुकानांना टाळे लागले. अहमदनगर जिल्ह्यातील ८२५ पैकी ६७५ दुकाने बंद करण्यात आली. मराठवाड्यातही धडक मोहीम राबवून दुकाने बंद करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील ४९४, हिंगोली जिल्ह्यातील १६५ आणि परभणी जिल्ह्यातील २१६ दुकाने बंद करण्यात आली. गोव्यात पहिल्यांदा बंदपणजी : गोव्यातील ३ हजार २१० दारूची दुकाने शनिवारी बंदच होती. गोवा हे पर्यटन राज्य आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे ३ हजार २१० मद्यालये बंद राहाण्याचा अनुभव राज्याला प्रथमच येत आहे. या दुकानांना पाचशे मीटर अंतराच्या बाहेर स्थलांतर करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.परवाने रद्द केलेले नाहीतआम्ही दारूविक्रीचे परवाने रद्द केलेले नाहीत. महामार्गापासून ५०० मीटर अंतरापुढे बार आणि दारूची दुकाने अन्यत्र हलविण्याची परवानाधारकांना मोकळीक आहे. दारूचा साठा नसलेल्यांना ‘नील’चे प्रमाणपत्र दिले जात आहे, तर बार व रेस्टॉरन्ट एकत्र असलेल्या ठिकाणी दारूच्या गोदामाला सील लावले आहे, असे राज्य उत्पादन शुल्क (नागपूर विभाग)च्या अधीक्षिका स्वाती काकडे म्हणाल्या.हॉटेलमध्ये जाऊन मद्यपान करणाऱ्यांची संख्या ७० टक्के आहे. केवळ ३० लोक दुकानांमधून मद्य खरेदी करतात. या निर्णयामुळे राज्यातील ८० टक्के बार व दुकाने बंद झाली आहेत. खरे तर वाइन आणि इतर मद्य असा फरक सरकारने केला पाहिजे, असे इंडियन ग्रेप असोसिएशन बोर्डाचे माजी अध्यक्ष जगदीश होळकर यांनी सांगितले.खान्देशात नंदुरबार वगळता, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील अनुक्रमे ६०० आणि २६० दुकाने बंद करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील बहुसंख्य दुकाने महामार्गापासून ५०० मीटर दूर असल्याने, ती सुरूच राहिली. नाशिक जिल्ह्यातील ७८० दुकानांवर कारवाई करण्यात आली.