पोलादपूर : तालुक्यातील भोगांव ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात अंदाजे ७0 ते ८0 फूट रस्ता खचला आहे. या ठिकाणी दरवर्षी रस्ता खचतो. दरवर्षी मेगाब्लॉक घेवून येथे भरावाचे काम केले जाते. मात्र कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी महामार्ग बांधकाम विभाग अपयशी ठरला आहे. कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. महामार्ग बांधकाम विभागाने तात्पुरती उपाययोजना करून या ठिकाणी एकेरी वाहतूक चालू केली आहे.तालुक्यात आड, निवे ताम्हणे मार्ग, हलदूले रानकडसरी मार्ग, चिरखिंड आंबेमाची मार्ग या मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. तर उमरठ ढवळे रस्त्यावर चांदके गावजवळ रस्त्यावर दरड आल्याने ढवळे वस्तीची एसटी तिकडेच अडकून पडली. तसेच मोरसडे विभागातील बालमाची रस्ता ठिकठिकाणी वाहून गेला. दाभिल हलदुले रस्ता गडग्याजवळ खचला आहे. तसेच दाभिलकडे जाणाऱ्या मार्गावरील सावित्री नदीवरील पुलाचा भराव काही प्रमाणात वाहून गेला आहे.तसेच देवळे केवनाळे पायवाट मार्गावरील साकवाचे पिलर कुमकवत झाल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली.आजही पोलादपुर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत असून आज तालुक्यतील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. महाड पोलादपुर मार्गावरील ब्रिटिशकालीन पुल वाहून गेल्याच्या घटनेचा परिणाम पोलादपुर बाजरपेठेवर दिसून येत होता.तालुक्यातील प्रत्येक व्यक्ति घटनास्थली जात होते.काटेतलि नागांव रस्त्यावर आलेली दरड सा.बा. विभागाने तातडीने बाजूला केली व् वाहतूक सुरळीत केली. >महाड बाजारपेठेत पाणी साचल्याने व्यापारी चिंतेतपोलादपूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत असून अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. महाड बाजारपेठेत पाणी साचल्याने व्यापारी वर्ग चिंतेत आहेत.महाड पोलादपूर मार्गावरील ब्रिटिशकालीन पुल वाहून गेल्याच्या घटनेचा परिणाम पोलादपूर बाजरपेठेवर दिसून आला. याठिकाणी शुकशुकाट पहायला मिळाला. सावित्री नदी पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काटेतली नागांव रस्त्यावर आलेली दरड सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
कशेडी घाटातील महामार्ग खचला
By admin | Published: August 04, 2016 2:20 AM