शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

हिमांशी कांकरिया यांना दीक्षा

By admin | Published: February 07, 2017 4:44 AM

भजन-प्रवचन, मंत्रोच्चार अशा अत्यंत धार्मिक व मंगलमय वातावरणात राजस्थानातील नागोर येथील सु़श्री़हिमांशी कांकरिया यांना सोमवारी महासती इंदुबालाजी

जळगाव : भजन-प्रवचन, मंत्रोच्चार अशा अत्यंत धार्मिक व मंगलमय वातावरणात राजस्थानातील नागोर येथील सु़श्री़हिमांशी कांकरिया यांना सोमवारी महासती इंदुबालाजी म़सा़ यांच्या सानिध्यात जैन भगवती दीक्षा देण्यात आली. हजारो जळगावकरांनी हा अनोखा मंगलमय सोहळा याची देही, याची डोळा अनुभवला. दीक्षा सोहळ््यानिमित्त सकाळी अभिविष्करण यात्रा काढण्यात आली. ही यात्रा स्वाध्याय भवनात पोहचल्यानंतर तेथे महासती इंदुबालाजी म़सा़, सुमतीप्रभाजी म.सा. यांच्या सेवेत हिमांशी कांकरिया यांनी क्षमायाचना केली व त्यानंतर वस्त्रपरिवर्तन व केशमुंडन होऊन महासती इंदुबालाजी म़सा़ यांच्या मुखाव्दारे जैन भगवती दीक्षा देण्यात आली. मुदीतप्रभाजी म.सा., कानमुनीजी म.सा., रंजनाजी म.सा., सुशीलाकंवरजी म.सा. आदी उपस्थित होते. सर्व पाठ व धार्मिक विधीनंतर घर-परिवार यांचा त्याग होऊन हिमांशी कांकरिया या साध्वी झाल्या.दीक्षा सोहळ््यास मुंबई येथील जैन समाजाचे राष्ट्रीय संयोजक मोफतराज मुणोद, चेन्नई येथील राष्ट्रीय अध्यक्ष पी़एस़सुराणा, उपाध्यक्ष महेंद्र कटारीया, जयपूर येथील माजी अध्यक्ष किसनचंद हिरावत, माजी मंत्री सुरेशदादा जैन, रतनलाल सी.बाफना, माजी खासदार ईश्वरलाल जैन, वर्धमान श्रावक संघाचे अध्यक्ष दलूभाऊ जैन, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)