शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

हिंदी-चिनी व्याही व्याही! ‘जोंगोव्ह’ची रुई-खानदेशाची सूनबाई!!

By admin | Published: April 04, 2017 8:42 AM

चहावाला झाला ‘मर्चंट आॅफ चीन : आव्हाण्याच्या बॉबीचा थक्क करणारा प्रवास

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 4 - आंतरराष्ट्रीय विवाह ही आता नवीन बाब राहिलेली नाही. मात्र भारत आणि चीन या दोन देशातील विवाहसंबंधाच्या घटना मात्र अपवादात्मक आहे. चोपड्यात चहा विक्री करीत असताना ‘मर्चंट आॅफ चीन’ ठरलेल्या जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील बनवारी (बॉबी) जाधव व जोंगोव्ह प्रातांतील रुईबाई यांच्या विवाहानंतर ‘हिंदी-चीनी व्याही व्याही’चा अनुभव आला. नव्याने निर्माण झालेल्या या नात्यातून आव्हाण्यातील एका गुर्जर तरुणाला चीनकडून वधू तर मिळालीच त्यासोबत चीनचे नागरिकत्वही मिळाले आहे.

बॉबी आणि रुईचे जाईजुईजळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आव्हाणे येथील बॉबी श्रीराम जाधव हा झी-महासेलमध्ये सेल्समन म्हणून कामाला लागला. मालक मेहता यांनी चीनमधील गोन्जोव इथं सेल लावला. बॉबी विश्वासातील असल्याने त्याला काउंटर सांभाळण्यासाठी नेले. पुढे मेहतांनी तिथंच दुसरा व्यवसाय सुरु केला. बॉबी आणि आणखी तीन जण त्या ठिकाणी होते. बॉबी आता अस्खलित चिनी भाषा बोलू लागला होता. दरम्यान रुई व्यवस्थापनातील पदवीच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मेहतांच्या कार्यालयात रुजू झाली. इथंच बॉबी आणि रुईचे जाईजुई झाले.

बॉबीचा मर्चंट आॅफ चीनचा प्रवासमेहतांनी पुढे इथल्या व्यवसायातील इंटरेस्ट काढून घेत बॉबीकडे जबाबदारी सोपविली. साईबाबांचा भक्त असलेल्या बॉबीने ‘साई’ नावाने चिनी ट्रेडिंग कंपनी सुरु केली. आता कंपनी रुईच्या नावावर आहे. म्हणून रुई हे कंपनीचे नाव आहे. साई हे नाव कंपनीतून काढून बॉबी आणि रुईच्या छकुल्याला दिले. बॉबीला आता रितसर चीनचे नागरिकत्व मिळाले आहे.

हिंदी-चिनी व्याही-व्याहीला दोन्ही कुटुंबाचा विरोधजाधव हे अगदी पारंपरिक स्वरुपाचे गुर्जर. दोघांच्या लग्नाला चीनमधून विरोध होता. रुईचं आजोळचं घराण सामंतांचं. रुईचे मामाही त्यामुळे विरोधात होते. गुर्जर कोण असतात, काय करतात हे सगळं या मामानं इंटरनेटवर सर्च केलं. रुई व बॉबी एकमेकांशिवाय जगायचं नाही म्हणताहेत म्हणून नाईलाजाने होकार दिला.

रुईचा कुळाचारात हौसेने सहभागलग्नाआधीही एकदा रुई इथं जळगावला येऊन गेली. तावसे, मोहिदे, लोणी, आव्हाणे ही गुर्जरांची गावे फिरून आली. तिने आव्हाण्यात सगळ्या कुळाचारांत उत्साहाने सहभाग घेतला. ‘कानबाई-रानबाईचे रोट, आखाजीचे झोके, कळण्याच्या भाकरी असं सगळं तिने जाणून घेतलं. आव्हाण्याजवळील ‘डिकसाई’ हे गावाच नाव ऐकून आपण चीनमध्ये आहोत असं ती म्हणाली.

बॉबी म्हणजे जोंगोव्हमधलं जळगावबॉबी आणि रुईच्या लग्नापूर्वी बॉबीचे मोठे बंधू ज्ञानेश्वर हे तीन वर्ष चीनला राहून आले. काही दिवसांपूर्वी जळगावातून मिलिंद थत्ते आणि रुपेश महाजन हे साऊंड इंजिनिअरींग तंत्राच्या माहिती संदर्भात चीनला गेले होते. तिथे जळगावचे म्हणून बॉबीनेच त्यांची विचारपूस केली. किरण बच्छाव यांनादेखील हाच अनुभव आला. जळगावातून जोंगोव्हला जे कुणी आले, त्यांच्यासाठी बॉबी म्हणजे जोंगोव्हमधलं जळगाव आहे.

चीन जवान वांग नंतर बनवारी बॉबीदहा वर्षांपूर्वी भारताने घुसखोर म्हणून कैद केलेला वांग हा चिनी जवान अलीकडेच (मध्यप्रदेशातील बालाघाटमध्ये) कोर्टाकडून सुटला आहे. याच ठिकाणी लक्ष्मी या भारतीय महिलेसह लग्नाच्या बेडीत तो अडकला. विष्णू या लहान मुलासह वांग आता सपत्निक चीनला रवाना झालेला आहे. दुसऱ्या घटनेत आव्हाण्याचे बनवारी (बॉबी) जाधव हे आपल्या रुई चँग या चिनी पत्नी आणि साई या छकुल्यासह चीनला रवाना झाले आहेत.

बॉबीचे बनवारी नामकरणबॉबी यांचे वडील श्रीराम जाधव यांची चोपड्यात डॉ.दीपक पाटील यांच्या दवाखान्यासमोर चहाची टपरी होती. त्यांना ज्ञानेश्वर व बॉबी ही दोन मुले आहेत. श्रीराम यांचा एक उत्तर भारतीय मित्र होता. बॉबीचं नामकरण बनवारी असं त्यानेच केलं. बनवारी म्हणजे श्रीकृष्ण. मात्र नामसंस्कारात जसं प्रादेशिक औदार्य होतं, तसं विवाह संस्कारात नव्हतं!

चिनी मामाच्या मते ‘मंगोलाइड’ श्रेष्ठचवांशिक दृष्ट्या गुर्जर हे इंडो आर्यन आहेत. रुई ही वांशिक दृष्ट्या ‘मंगोलाइड आणि त्यातही सामंत घराण्यातली. रुईच्या मामाला इंटरनेटवरून माहिती घेत असताना चीनमधून भारतात आलेल्या युवान श्वांगनं गुर्जरांचा केलेला ‘किऊ-चे-लो’ हा उल्लेख आढळला. गुर्जर प्रतिहार वंशाचं साम्राज्य कन्नौजपासून गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र असं विस्तिर्ण होतं, अशी माहिती मिळाली. त्यानंतर त्याने बॉबीला होकार दिला. वरचढ वंश आमचाच या म्हणण्यावर हा चिनी मामा आजही कायम आहे. बॉबी आणि रुई यांचे अपत्य साई हा रुईवर पडल्याने चिनी मामा आपल्या मतावर जास्तच ठाम झाला.