वाडा : तालुक्यातील घोणसई येथील जयदुर्गा मित्रमंडळातर्फे हिंदू महिलांना साडी व मिठाई भेट देऊन सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मेमन यांनी ऐक्याचा संदेश देणारी भाऊबीज साजरी केली.घोणसई मेट या ग्रामपंचायतीचे दिलीप पाटील हे माजी उपसरपंच आहेत. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते व नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुस्तफा मेमन यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. मुस्तफा यांनी या नावीन्यपूर्ण कल्पनेला होकार दिला. ते आले त्यांनी स्वत: साडी व मिठाई खरेदी करून आणली आणि स्वत:चे औक्षण करवून घेऊन समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला. या अनोख्या भाऊबीजेची भेट स्वीकारून महिलांनीही नवा पायंडा पाडला. विशेष म्हणजे या वेळी मुस्तफा यांंनी दिवाळी व भाऊबीज का साजरे करतात याची आख्यायिका रामायण महाभारताचे दाखले देऊन सांगितली.या कार्यक्र मासाठी डॉ. गिरीश चौधरी, अशोक पाटील, दर्शना भोईर यांच्यासह गावातील महिला व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र मातून पाहुण्यांनी यथोचित उद्बोधन केले. यावेळी उपस्थित तीनशेहून महिलांना भेट देऊन ऐक्याची अनोखी भाऊबीज करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनेश पाटील यांनी केले. (वार्ताहर)
हिंदू -मुस्लिम ऐक्याची भाऊबीज
By admin | Published: November 03, 2016 3:04 AM