शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

हिंदू राज्यकर्तेच हिंदू समाजाचे सगळ्यात मोठे दुश्मन - उद्धव ठाकरे

By admin | Published: April 16, 2016 8:04 AM

हिंदूंना आपल्याच हिंदुस्थानात खतम करण्याची भाषा होत असताना हिंदूंच्या सुरक्षेबाबत एकही राज्यकर्ता उसळून बोलत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - हिंदूंना आपल्याच हिंदुस्थानात खतम करण्याची भाषा होत असताना हिंदूंच्या सुरक्षेबाबत एकही राज्यकर्ता उसळून बोलत नाही अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली आहे. या देशात हिंदू असणे हा अपराधच झाला आहे व हिंदू राज्यकर्तेच हिंदू समाजाचे सगळ्यात मोठे दुश्मन बनले आहेत. सत्तेने माणूस आंधळा होतो, पण इथे तर सत्तेमुळे डोळ्यांच्या साफ खाचा होऊन बुबुळेच बाहेर पडली आहेत, असे टीकास्त्र त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून सोडले आहे. तसेच हिंदू रक्षणाची आरोळीही कधी कोणीही ठोकणार नाही, हिंदूना एकजुटीने भगव्याखाली उभे राहावे लागेल, असेही उदअधव यांनी म्हटले आहे.
हिंदुस्थानातील हिंदूंचा खात्मा करण्याची भाषा ‘इसिस’ने पुन्हा केली आहे. संपूर्ण जगात इस्लामच्या नावाने हिंसा घडवून अराजक माजवले जात आहे व हिंदूंच्या मानेवर तलवार ठेवून धर्मांध अतिरेकी धमक्या देत आहेत. हे सर्व चित्र भयंकर असले तरी हिंदूंच्या बाजूने ठामपणे उभा राहणारा एकही माईका लाल या भूमीत दिसत नाही. हिंदूंना मारण्याची भाषा जेव्हा केली जाते तेव्हा येथील हिंदुत्ववादी राज्यकर्ते कानात बोळे व तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन बसतात. मात्र अशीच धमकी जर मुसलमान व अन्य धर्मीयांच्या बाबतीत दिली असती तर एव्हाना सरकारातील बडे लोक छातीची ढाल करून त्यांच्या रक्षणासाठी उभे राहिले असते, असेही उद्धव यांनी म्हटले आहे. तसेच काश्मीरमध्ये सत्तेसाठी पीडीपीशी युती करणा-या भाजपा सरकारवर उद्धव यांनी टीकास्त्र सोडले आहे. ' जे लोक कालपर्यंत हिंदू पंडितांची चिंता वाहण्याचे राजकारण करीत होते ते आज स्वत: कश्मीरात सत्तेत आहेत व ज्यांनी हिंदूंना पळवून लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अशा लोकांबरोबर सत्तेची हातमिळवणी झाली आहे,' अशी टीका उद्धव यांनी केली आहे.
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे :
- कोणीही उठतो आणि हिंदुस्थानच्या कानफटात मारतो असे नेहमीच घडताना दिसत आहे. हिंदुस्थानातील हिंदूंचा खात्मा करण्याची भाषा ‘इसिस’ने पुन्हा केली आहे. हिंदू लोकांसह इस्लाम न मानणार्‍या लोकांचा खात्मा करू, संपूर्ण हिंदुस्थानात शरीयत कायदा लागू करू असे या मंडळींनी सीरियात बसून जाहीर केले आहे. हिंदूंना खतम करण्याची भाषा यापूर्वी अल कायदा, तोयबासारख्या अतिरेकी संघटनांनी अनेकदा केली आहे. संपूर्ण जगात इस्लामच्या नावाने हिंसा घडवून अराजक माजवले जात आहे व हिंदूंच्या मानेवर तलवार ठेवून धर्मांध अतिरेकी धमक्या देत आहेत. हे सर्व चित्र भयंकर असले तरी हिंदूंच्या बाजूने ठामपणे उभा राहणारा एकही माईका लाल या भूमीत दिसत नाही. राममंदिरप्रश्‍नी भाजपने अलगद आपल्या काखा वर केल्या आहेत. येथील स्वत:स हिंदुत्ववादी मानणारे पुढारी अधूनमधून गर्जना करीत असतात, पण इसिससारख्या संघटनांशी मुकाबला करण्याच्या बाबतीत सगळ्यांच्याच मिश्या खाली पडत असतात. 
- नागपुरात कन्हैयाकुमारच्या गाडीवर दोन दगड मारल्याने हिंदुत्व मजबूत होण्याऐवजी कन्हैयासारख्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळत आहे व ते हिंदुत्वासाठी बरे नाही. हिंदूंना मारण्याची भाषा जेव्हा केली जाते तेव्हा येथील हिंदुत्ववादी राज्यकर्ते कानात बोळे व तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन बसतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ‘इसिस’ किंवा अन्य दहशतवादी संघटनांनी अशा प्रकारची धमकी येथील मुसलमानांच्या बाबतीत वा अन्य धर्मीयांच्या बाबतीत दिली असती तर एव्हाना सरकारातील बडे लोक छातीची ढाल करून त्यांच्या रक्षणासाठी उभे राहिले असते. मुसलमानांच्या वा ख्रिश्‍चनांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा गर्जना सरकारी पातळीवर झाल्या असत्या व अल्पसंख्याक म्हणून या लोकांच्या सुरक्षेसाठी चिंतामय उसासे टाकण्याची राष्ट्रीय स्पर्धाच लागली असती. 
- कश्मीरातील हिंदू पंडितांचे जे शिरकाण गेली पंचवीसेक वर्षे सुरू आहे तो तरी काय प्रकार आहे? तिथेही पद्धतशीरपणे हिंदूंचा खात्माच झाला आहे व जे हिंदू पंडित वाचले आहेत ते आपल्याच देशात निर्वासिताचे जिणे जगत आहेत. जे लोक कालपर्यंत हिंदू पंडितांची चिंता वाहण्याचे राजकारण करीत होते ते आज स्वत: कश्मीरात सत्तेत आहेत व ज्यांनी हिंदूंना पळवून लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अशा लोकांबरोबर सत्तेची हातमिळवणी झाली आहे, पण तिथे आजही हिंदूंना प्रवेश नाही व हिंदूंनी पुन्हा परत यावे यासाठी विशेष प्रयत्न नाहीत. 
- या देशात हिंदू असणे हा जणू अपराधच झाला आहे व हिंदू राज्यकर्तेच हिंदू समाजाचे सगळ्यात मोठे दुश्मन बनले आहेत. सत्तेने माणूस आंधळा होतो, पण इथे तर सत्तेमुळे डोळ्यांच्या साफ खाचा होऊन बुबुळेच बाहेर पडली आहेत. म्हणूनच स्वराज्यातील हिंदूंची दुर्दशा व असुरक्षित जगणे राज्यकर्त्यांना दिसत नाही. हिंदूंना आपल्याच हिंदुस्थानात खतम करण्याची भाषा होत असताना हिंदूंच्या सुरक्षेबाबत एकही राज्यकर्ता, पुढारी उसळून बोलत नाही. पठाणकोटच्या हल्ल्याचा बदला घेऊ असे एक विधान संरक्षण मंत्र्यांनी केले. तो बदला घेण्याचा दिवस जसा उजाडणार नाही तशी हिंदू रक्षणाची आरोळीही कधी कोणी ठोकणार नाही. हिंदूंनाच एकजुटीने भगव्याखाली उभे राहावे लागेल!