मुंबई - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाणार असून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे सरकारच्यावतीने पीडितेची बाजू मांडणार आहेत. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली आहे.
हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाच्या विरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित तरुणीवर नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतानाच आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यासाठी राज्यभर कुठे मोर्चे, कुठे निदर्शनं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्विटद्वारे हे प्रकरण कोर्टात सरकारच्यावतीने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम चालवणार असल्याची माहिती दिली आहे. हिंगणघाटमधील जळीत प्रकरणी खटला लवकरात लवकर निकाली काढण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टाकडे दिला जाईल. या खटल्यात पीडितेची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाईल, असं गृहमंत्र्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. तसेच पीडितेच्या खटल्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल,' असे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हिंगणघाट जळीत प्रकरण : वर्ध्याचे खासदार पाचव्या दिवशी पीडितेच्या भेटीला, एक महिन्याचे दिले मानधन
हिंगणघाट जळीत प्रकरण: नकार पचविणे अवघड गेल्याने नराधमाने केले अमानुष कृत्य
हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला हिंगणघाट पोलिसांनी नागपूर पोलिसांच्या मदतीने अटक करून त्याची शनिवार ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, असे असले तरी घटनेच्यावेळी आरोपी एकटाच होता की त्याच्यासोबत कुणी सहकारी होता याची इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरातील आणि विविध पेट्रोलपंपांवरील सीसीटीव्हीचे चित्रिकरण पोलिसांकडून तपासले जात आहे. त्यासाठी पोलिसांच्या सुमारे दोन चमू रवाना करण्यात आल्या असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर खात्रीलायक पोलीस सूत्रांनी सांगितले. प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या सूचनेवरून या प्रकरणाचा तपास तातडीने पुलगाव येथील महिला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे वळता करण्यात आला.