हिंगोली: जिल्हा परिषदेत आता नवीन पदाधिकारी निवडीसाठी फिल्डिंग लावणारे कामाला लागले आहेत. पहिल्या टर्ममध्ये हिरमोड झालेले यावेळी तरी संधी मिळेल की नाही, या विवंचनेत आहेत. काहींनी स्थानिक स्तरावर तर काहींनी वरिष्ठ नेत्यांकडे चकरा मारण्यास प्रारंभ केला आहे. जिल्हा परिषदेत सध्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेत आहे. आता पुन्हा हीच आघाडी सत्तेत येईल, अशीच चिन्हे आहेत. मात्र पदे बदलण्यावरून व इतर काही बाबींवरून नेत्यांमध्ये काही चर्चा नसली तरीही सदस्यांमध्ये मात्र चर्चा रंगत आहे.
यावरून काही बिघडले तरच वेगळे चित्र दिसण्याची शक्यता आहे. एरवी आहे ती परिस्थिती कायम ठेवून सत्ता संपादन करणे काही अवघड नाही. शिवसेनेकडे अध्यक्षपदासाठी गणाजी बेले यांच्या रुपाने एकमेव दावेदार आहे. कळमनुरी मतदारसंघालाच सलग दुसऱ्यांदा नैसर्गिकरीत्याच संधी मिळणार आहे. महिला व बालकल्याण सभापतीपद यावेळी वसमत विधानसभेत देणे अभिप्रेत आहे. त्यामुळे सिंधूताई झटे या दावेदार मानल्या जात आहेत. तर हिंगोली विधानसभेतच हे पद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असल्याने तसे झाल्यास मागच्या वेळी अन्याय झालेल्या मंगला कांबळे यांना संधी द्यावी, अशी अपेक्षा आहे. शिवाय रुपाली पाटील गोरेगावकर यांचेही नाव चर्चेत आहे.
राष्ट्रवादीकडून इच्छुकांची यादी इतकी लांबलचक आहे की, उपाध्यक्षपदासाठी मागच्या वेळी पदाधिकारी राहिलेले दोघे सोडून इतर दहाही जण इच्छुक आहेत. मात्र मनीष आखरे, यशोदा दराडे, संजय कावरखे. राजेंद्र देशमुख रलमाला चव्हाण यांचे नाय सध्यातरी आघाडीवर दिसत आहे. उर्वरित इच्छुकांपैकी एकाची कृषी सभापतीपदी वर्णी लागू शकते. मात्र सगळ्यांचाच डोळा उपाध्यक्ष पदावर असल्याने या पदाविषयी कुणी चर्चाही करायला तयार नाही. काँग्रेसकडे समाजकल्याण व शिक्षण ही दोन्ही महत्त्वाची सभापतीपदे आहेत. समाजकल्याण सभापतीपदासाठी डॉ.सतीश पाचपुते तर शिक्षण सभापतीपदासाठी दिलीपराव देसाई, कैलास सोळुंके यांची नावे चर्चेत आहेत.
भाजपलाही सत्तेची आस
यावेळी भारतीय जनता पक्षाकडून येनकेन प्रकारे सत्ता येण्याचा प्रयल सुरु आहे. तसे झाल्यास मात्र वरील सर्वच समीकरणांवर पाणी फेरले जाणार आहे. मागच्या वेळी महायुतीत असतानाही सेनेने भाजपला सोबत घेतले नव्हते. यावेळी तर वरिष्ठ पातळीवर शिवसेना व भाजपमधून विस्तवही जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीचे फावणार आहे.
सेना व काँग्रेसमध्ये होतेय धुसफूस
समाजकल्याणच्या निधीवरुन शिवसेनेचे सदस्य फकिरा मुंडे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र सेनेच्या कोणीही त्यांची समजूत काढली नव्हती, याचा काँग्रेसला राग आहे. शिवाय मागच्या वेळी कळमनरी पंचायत समितीत शिवसेनेने काँग्रेसचे सदस्य फोडून शिवसेनेचा उपसभापती करुन करघोडी केली होती. त्यामळे काँग्रेस व सेनेतील ही घसफूसही काही वेगळे रंग दाखविणार का, हे लवकरच कळणार आहे.