शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

हिरानंदानी रुग्णालयाचा वादग्रस्त करार रद्द

By admin | Published: January 20, 2017 4:47 AM

वाशीतील हिरानंदानी फोर्टीज सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा करार पालिकेने रद्द केला

नामदेव मोरे,

नवी मुंबई- वाशीतील हिरानंदानी फोर्टीज सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा करार पालिकेने रद्द केला आहे. मोफत उपचारांसाठी पालिकेने अल्पदरात हिरानंदानीला इमारत दिली. पण १० वर्षांमध्ये सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार मिळालेच नाहीत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या फसलेल्या निर्णयांमध्ये हिरानंदानी सुपरस्पेशालिटीबरोबर केलेल्या कराराचा समावेश आहे. शहरातील गरीब रुग्णांवर मोफत सुपरस्पेशालिटी उपचार करता यावेत यासाठी २००६मध्ये हिरानंदानीला अल्प दराने वाशी रुग्णालयाची २० हजार चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली. या परिसरातील बाजारभाव ६० ते १०० रुपये प्रतिचौरस फूट असताना पालिकेने फक्त ३ रुपये ७५ पैसे दराने संबंधितांना जागा उपलब्ध करून दिली. पण काही दिवसांमध्ये हिरानंदानीने त्यांचे सर्व शेअर फोर्टीजला विकले व तेथे २००८मध्येच फोर्टीज रुग्णालय सुरू झाले. येथे १५ बेड पालिकेने सांगितल्याप्रमाणे रुग्णांसाठी राखीव ठेवले होते; पण धोरण निश्चित झाले नसल्याने तीन वर्षे एकही रुग्ण पाठविला नाही. वाशीतील सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर व न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर पालिकेने करार रद्द केला आहे.>फोर्टीजची भूमिका काय?हिरानंदानी फोर्टीज रुग्णालयाचा करार रद्द केल्यानंतर याविषयी व्यवस्थापनाची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; पण उशिरापर्यंत व्यवस्थापनाची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. याविषयी लवकरच भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याचे समजले.