शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

ऐतिहासिक ठिकाणांची स्वच्छता

By admin | Published: April 28, 2016 3:17 AM

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराच्या विविध भागांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराच्या विविध भागांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. बुधवारी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ब्रिटिशकालीन इलठाणपाडा येथील धरण व परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे बेलापूर येथील किल्ला परिसरातही ही राबविण्यात आली. तत्पूर्वी याच मोहिमेचा एक भाग म्हणून मंगळवारी दिघ्यातील यादवनगर विभागात उघड्यावर शौचविधी करणाऱ्या १० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात जोरदार स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. एप्रिल महिन्यात विविध विभागांत ही मोहीम राबविण्यात आली. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव तथा स्वच्छ भारत अभियानाचे प्रमुख प्रवीण प्रकाश यांच्या निर्देशानुसार १६ ते ३0 एप्रिल या कालावधीत शहरातील ऐतिहासिक व धार्मिकस्थळांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार बुधवारी इलठाणपाडा येथील ब्रिटिशकालीन धरण आणि बेलापूर येथील ऐतिहासिक किल्ला परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. या दोन्ही ठिकाणच्या मोहिमेला दिघा विभाग अधिकारी गणेश आघाव, स्वच्छता निरीक्षक राजीव बोरकर, वीरेंद्र पवार तसेच बेलापूर विभाग अधिकारी एस. डी. आडागळ, कोपरखैरणे विभाग अधिकारी किशोर खाचणे उपस्थित होते. दरम्यान, मंगळवारी दिघा येथील यादवनगरमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आाली. याअंतर्गत उघड्यावर प्रातर्विधी करणाऱ्या ११ जणांवर प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच उघड्यावर प्रातर्विधी केल्यानंतर त्याचे होणारे दुष्परिणाम याबाबत यावेळी जनजागृतीही करण्यात आली. याच मोहिमेचा एक भाग म्हणून निर्बंध असलेल्या कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या चार दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत ऐरोली विभागातील दोन सामाजिक संस्थांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)