शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

पुणे मेट्रोच्या मार्गात ऐतिहासिक वास्तू

By admin | Published: July 12, 2016 3:46 AM

मुंबई मेट्रोपाठोपाठ आता पुणे मेट्रोच्या मार्गातही अडथळे निर्माण झाले आहेत. शनिवारवाडा, पाताळेश्वर मंदिर आणि आगाखान पॅलेस या ऐतिहासिक

दीप्ती देशमुख,  मुंबईमुंबई मेट्रोपाठोपाठ आता पुणे मेट्रोच्या मार्गातही अडथळे निर्माण झाले आहेत. शनिवारवाडा, पाताळेश्वर मंदिर आणि आगाखान पॅलेस या ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रातून पुणे मेट्रोचा मार्ग जात असल्याने राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय या प्रकल्पाला मंजुरी देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवर राज्य सरकार, पुणे महापालिका दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोशन, राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणाला येत्या दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.पुणे मेट्रो ३१.५ कि. मी धावणार आहे. या मेट्रोचा मार्ग क्रमांक १ पाताळेश्वर मंदिर व शनिवार वाडा व मार्ग क्रमांक २ पाताळेश्वर मंदिर ते आगाखान पॅलेस या ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रातून जाणार आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या १०० मीटर परिसरात विकास करण्यास कायद्याने प्रतिबंध असतानाही याच क्षेत्रातून पुणे मेट्रोचे दोन मार्ग काढण्यात येणार आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने पुण्याच्या ‘परिसर संरक्षण संवर्धन संस्थे’ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या याचिकेनुसार, पुणे महापालिकेने मेट्रोसाठी सल्लागार म्हणून दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोेशनची (डीएमआरसी) नियुक्ती केली. डीएमआरसीने मेट्रोचे दोन मार्ग पाताळेश्वर मंदिर, शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस या तीन ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रातून सुचवले आहेत. पुणे महापालिकेने प्रस्तावित विकास आराखड्यात हे दोन्ही मार्ग दाखवले आहेत. सरकारनेही या मार्गांना मंजुरी दिली आहे. मात्र मंजुरी देण्यापूर्वी राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी मिळवलेली नाही. तसेच सर्वेक्षणही करण्यात आलेले नाही. उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह, पुणे महापालिका, राष्ट्रीय स्मारके प्राधिकरण, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनसह अन्य प्रतिवाद्यांना दोन आठवड्यांत यासंदर्भात उत्तर देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)