शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

मैत्रीच्या बंधातून इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे '' हिस्टरी एक्सपेडिशन्स'' 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 7:00 AM

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेला एक ग्रुप जो मैत्रीच्या ऋणानुबंधनातून इतिहासाच्या पाऊलखुणा जपतोय...

- दीपक कुलकर्णी-  

पुणे: ज्या व्यक्तीसोबत सहज व्यक्त होता येते ती मैत्री. कधी कधी एकाच ध्येयाने प्रेरित होवून एक एक मित्रांची सुंदर शृंखला होत मैत्रीचे बंध फुलवणारा ग्रुप जमतो. ज्यात वाद विवाद होतात पण संवाद जपला जातो. कुणी धडपडतो ,कुणी चुकतो तसा त्यांना रागावले जाते तसा हक्काचा मदतीचा हातही दिला जातो. कसलेही आढेवेढे न घेता इतिहासाचे वेड, आणि महाराजांच्या चरणी समर्पित भावनेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेला एक ग्रुप जो मैत्रीच्या ऋणानुबंधनातून इतिहासाच्या पाऊलखुणा जपतोय..त्या ग्रुपचं नाव आहे '' हिस्टरी एक्सपेडिशन्स.. ''       छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र, गडकिल्ले आणि प्राचीन मंदिरे यावर काम करणारा हा ग्रुप. गेल्या ९ वर्षांपासून हा ग्रुप कार्यरत आहे.या ग्रुपचे वैशिष्टये म्हणजे इथे आवडीप्रमाणे कामाची संधी उपलब्ध करुन दिले जाते. विविध क्षेत्रातील सहभागी लोकांची आवड,  कौशल्याला परिपूर्णतेची जोड देत इतिहासाची जपणूक करताना सामाजिक कार्यातलं योगदान दिल्याचे समाधान या ग्रुपमधून मिळते. यात फोटोग्राफी, चित्रकला, मोडी भाषा प्रेम, संशोधन, व्याख्याने, या छंदाप्रमाणे काम करण्याची संधी दिली जाते. देशभरातील गड, भुईकोट, सागरी किल्ल्यांना प्रत्यक्ष भेटी, त्यांचा आर्किटेक्चर नजरेतून अभ्यास, कागदपत्रांची जमवाजमव, प्राचीन दगडी मंदिरे,  संशोधन,जुन्या वस्तूंचा संग्रह अशा विविध अंगानी इतिहासाच्या प्रांतांत हा हिस्टरी एक्सपेडिशन्स हा ग्रुप मस्तपैकी मुशाफिरी करतो आहे. तसेच या ग्रुपच्या माध्यमातून इतिहासाप्रति आस्था, प्रेम निर्माण व्हावे, आणि अभूतपूर्व पराक्रमाचे बाळकडू मिळावं या अनुषंगानेच केलेल्या ३५० किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत.विविध शाळांमध्ये शिवनेरी ते रायगड या स्लाईड शोचे असंख्य प्रयोग यांनी विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढविण्याचा एक प्रयत्न केला जातो. यातून स्टडी टूर्स, गडकिल्ल्यांवरील स्वच्छता, वृक्षसंवर्धन, वीर गळींचा अभ्यास , ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन यासाठी प्रयत्न आणि आर्थिक यासाठी प्रत्येकजण कुटुंब, व्यवसाय सांभाळत सर्वतोपरी योगदान देत इतिहासावरचे जीवापाड प्रेम जपतो.        प्रसाद तारे यांच्या अधिपत्त्याखाली हा ग्रुप कार्यरत आहेत. या ग्रुपमध्ये अनिकेत डुंबरे, संतोष तांदळे, ऋषिकेश अंतरकर, बिपीन भोंग, सुदर्शन तौर, अतुल जोशी,  गिरीश दिवटे, अमोल पोखरकर, अमित दारुणकर, व्यास वरे यांसारख्या जवळपास महाराष्ट्रभर ३०० ते ३५० इतिहासप्रेमी या ग्रुपशी जोडले गेले आहे.  व्हाट्स अप , फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर हा देखील इतिहासातील अनेक गोष्टींची माहिती आपल्याला मिळत राहते. 

हिस्टरी एक्सपेडिशन्स ग्रुपचे प्रसाद तारे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र, गडकिल्ले आणि प्राचीन मंदिरे यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. या इतिहासाठून आपल्या आयुष्यात उद्भवलेल्या कठीण प्रसंगातून सावरण्याची जिद्द , प्रेरणा मिळते.  इतिहासाचे ही अंगे माणसाला समाधान देऊन जातात. 

टॅग्स :PuneपुणेhistoryइतिहासSocial Mediaसोशल मीडिया