विठ्ठल सोनुने, पिंपळगाव सैलानी (जि. बुलडाणा)सर्वधर्माचे श्रद्धास्थान असलेला हाजी अब्दूल रहेमान उर्फ सैलानी बाबाच्या यात्रेत लाखो भाविकांच्या उपस्थितीत १२ मार्च रोजी नारळाची होळी करण्यात आली. नारळ होळीत अर्पण करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी बहुसंख्य भाविकांनी त्यांच्या श्रद्धेनुरुप नारळाचे होळीत अर्पण केले. यावेळी भाविकांनी अंगातील जुने कपडेदेखील या होळीत टाकले. सैलानी बाबाचे परंपरागत मुजावर शेख रफिक मुजावर, हाजी शे.हाशम मुजावर, शे.नजीर शे.कासम मुजावर, शे.शफिक मुजावर, शे.रशिद मुजावर, पं.स.सदस्य शे.चाँद मुजावर उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.अग्निशामक दलाची कसोटीप्रचंड प्रमाणात पेटलेली होळी आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला होळी विझविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. नजीम मुजावर यांनी सुरू केलेली होळीची सुरूवात सैलानी बाबाचे मुजावर शे.नजीर शे.कासम यांनी १९९० सालापासून सैलानी दर्गाजवळ होळी पेटविण्याची परंपरा सुरू केली होती. (वार्ताहर)
सैलानी येथे पेटली नारळाची होळी
By admin | Published: March 13, 2017 3:46 AM