अक्षय कुमारच्या ‘हॉलीडे’ या चित्रपटाने तीनच दिवसांत ४० कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटात अक्षयसोबत सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आर. मुर्गादॉस यांनी केले आहे. हिंदी चित्रपटात 1क्क् कोटी क्लबची सुरुवात मुर्गादॉस यांच्या गजनी या चित्रपटाने केली होती. यावेळीही त्यांच्या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला आहे. हॉलीडेने पहिल्या दिवशी १२ कोटींहून जास्त व्यवसाय केला. दुस:या दिवशी शनिवार असल्याने प्रेक्षकांची संख्या वाढली. रविवारीही चित्रपटाला चांगला प्रेक्षकवर्ग लाभला. या चित्रपटाचा वीकेंड व्यवसाय ४० कोटींच्या आसपास राहिला. या चित्रपटासोबतच रिलीज झालेल्या फिल्मिस्तान या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४५ लाखांचा गल्ला कमावला. रविवारअखेरीस या चित्रपटाने दीड कोटींचा व्यवसाय केला होता.
तीन दिवसांत ‘हॉलीडे’ने कमावले ४० कोटी
By admin | Published: June 10, 2014 12:06 AM