अनेक दिवसांनी एकाच दिवशी प्रदर्शित झालेले दोन चित्रपट हिट ठरण्याचा फॉम्यरुला या वेळी घडला. या वेळी ‘हॉलीडे’ आणि ‘फिल्मीस्तान’ हे दोन वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपटांच्या कथा खूप वेगळ्या असल्याने त्यांच्यात तशी स्पर्धाही नव्हती. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिलेली आहे. त्यांची कमाईही चांगली झाली आहे. तर त्याआधी प्रदर्शित झालेल्या टायगर श्रॉफच्या ‘हीरोपंती’ चित्रपटाने 5क् कोटींचा गल्ला पार करण्यात यश मिळवले आहे.
अक्षय कुमारच्या ‘हॉलीडे’ चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास, 7क् कोटी बजेटमध्ये हा चित्रपट तयार झाला होता. एकाच वेळी 4क् हजार प्रिंट्समध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तीन दिवसांत 4क् कोटींच्या आसपास कमाई केली आहे. अक्षयच्या मागील चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटाने केलेला व्यवसाय जास्त चांगला असल्याचे सांगितले जात आहे.
‘हॉलीडे’बरोबर प्रदर्शित झालेल्या ‘फिल्मीस्तान’ चित्रपटाविषयीही खूप उत्सुकता होती. 2क्12मध्ये हा चित्रपट तयार झाला होता. मात्र कोणताही मोठा कलाकार नसल्याने प्रदर्शन होण्यास विलंब होत होता. उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार, तसेच आंतरराष्ट्रीय पारितोषिकेही या चित्रपटाच्या नावे आहेत. भारत-पाकिस्तान संबंधावर वेगळ्या अंगाने बनलेल्या या चित्रपटाचे बजेटही 1 कोटीपेक्षा कमी होते. ते तीन दिवसांतच वसूल करत चित्रपटाने 2.75 कोटींची दमदार बाजी मारली.
या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अक्षय कुमारच्या ‘हॉलीडे’बद्दल मात्र लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. चित्रपट पाहून अनेक जण निराशही झाले. तर फिल्मीस्तान चित्रपटाविषयी उत्तम प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम चित्रपटावर झाला. या दोन्ही चित्रपटांना मिळालेला प्रतिसाद बघता बॉलीवूडमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.
गेल्या काही चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, टायगर श्रॉफच्या ‘हीरोपंती’ चित्रपटाने अपेक्षेप्रमाणो 52 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. तर हंसल मेहतांच्या ‘सिटीलाइट्स’ चित्रपटाने एकूण 1क् दिवसांत फक्त 6.8क् कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाला सरासरी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर प्रदर्शित झालेल्या ‘कुकु माथुर की झंड हो गई ’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी आपटला.
येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणा:या चित्रपटांपैकी ‘फुगली’ चित्रपटाविषयी जास्त आकर्षण आहे. शहरातील मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट बघणा:या तरुणाईसाठी हा चित्रपट तयार केला गेला आहे. ऑलिम्पिक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग या चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याचबरोबर मोहित मारवाहा, कियारा आडवाणी आणि जिमी शेरगिलही प्रमुख भूमिकेत आहेत.