जून महिना सुरू झाला, की वेध लागतात शाळा सुरू होण्याचे़ शाळेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी स्टेशनरी, बुक डेपो, छत्र्या, रेनकोट, युनिफॉर्म, स्कूलबॅग ह्या सर्व दुकानांत झुंबड उडू लागली आहे. विद्यार्थी आणि पालक वर्षभराच्या वह्या, पुस्तके, छत्री, रेनकोट, कंपास पेटी, लंच बॉक्स, पाण्याची बॉटल आदी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात दंग झाले आहेत. विद्यार्थी आपल्या आवडीचे शैक्षणिक साहित्य पाहिजे यासाठी हट्ट धरत आहेत. लहान मुलांच्या दप्तरांमध्ये या वर्षीही छोटा भीम भाव खाऊन आहे. त्याच्या जोडीला मोटू आणि पतलूची चित्रे असलेली दफ्तरेही लहान मुलांसाठी आकर्षण ठरली आहेत. शाळा सुरू होण्यास व पावसाची सुरुवात होण्याचा कालावधी जवळपास सारखाच असल्याने बाजारपेठेत रेनकोट, छत्र्या तसेच पावसाळी चपला उपलब्ध झाल्या आहेत.(छायाचित्रे : दत्ता खेडेकर)
सुट्टी संपली; तयारी शाळेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 02:26 IST