शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

परदेशी कलाकारांबाबत सर्वंकष धोरण आवश्यक

By admin | Published: April 28, 2016 2:53 AM

अनेकदा परदेशी कलाकार वर्क परमिटशिवाय हिंदी सिनेमांसाठी कामे करतात. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो.

मुंबई : अनेकदा परदेशी कलाकार वर्क परमिटशिवाय हिंदी सिनेमांसाठी कामे करतात. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात तत्काळ सर्वंकष पोलीस धोरण आखण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेच्या कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांची भेट घेतली. याबाबत लवकरच पोलिसांकडून एक निश्चित धोरण आखण्यात येईल, असे आश्वासन पडसलगीकर यांनी दिले.परदेशी कलाकारांची तसेच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे अधिकार चित्रीकरण ज्या ठिकाणी असेल तेथील स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष शरद बांभूळकर व सचिन चव्हाण यांचे शिष्टमंडळ आज सायंकाळी पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांना भेटले. चित्रीकरणासाठी आलेले परदेशी कलाकार ज्या हॉटेलमध्ये उतरतात, त्या हॉटेल्सनी परदेशी कलाकारांची माहिती पोलिसांना कळवायची असते. परंतु हॉटेलात उतरलेली परदेशी व्यक्ती ही मुंबईत फिरण्यासाठी पर्यटक म्हणून आलेली आहे की, सिनेमा चित्रीकरणात सहभागी होण्यासाठी म्हणजेच व्यावसायिक कामासाठी आलेली आहे, हे हॉटेल्सना कळवले जात नसल्यामुळे पोलिसांपर्यंत आवश्यक ती माहिती पोहोचतच नाही, असे शालिनी ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांना सांगितले.अनेकदा सिनेमाच्या शूटिंगचे मुख्य काम पूर्ण झालेले असते, मात्र तरीही काही वेळा एक-दोन दिवसांचे शूटिंग करून काही पॅचवर्क करावे लागते. अशा पॅचवर्कच्या वेळी परदेशी कलावंतांना आपल्या देशातील स्थलांतरितांच्या कायद्यानुसार (इमिग्रेशन अ‍ॅक्ट) दोन-चार दिवस काम करण्याची परवानगी मिळत नाही. म्हणूनच अशा स्थितीत ज्या ठिकाणी सिनेमाचे शूटिंग होणार आहे, तेथील परदेशी कलावंतांची पडताळणी स्थानिक पोलीस ठाण्यातून होणे गरजेचे आहे. त्यामुळे राजकीय पक्षांशी संबंधित काही चित्रपट कर्मचारी संघटना निर्मात्यांकडून पैसे उकळतात, त्यांनाही आपोआपच आळा बसेल. निर्मात्यांचीही गैरसोय होणार नाही, अशी भूमिका शालिनी ठाकरे यांनी या वेळी आयुक्तांसमोर मांडली.>प्रत्येक सिममध्ये महिला हेल्पलाइन क्र. १०३च्शहरातील महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस दलाने अनेक उपक्रम सुरू केले आहेत. मात्र आजही महिलांमध्ये पुरेशी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे अनेक अत्याचारग्रस्त महिला पोलीस ठाण्यात जाण्याचे टाळतात. च्म्हणूनच ज्याप्रमाणे प्रत्येक मोबाइल सिममध्ये पोलीस क्रमांक १०० हा असतोच. त्याप्रमाणे प्रत्येक सिमकार्डमध्ये महिला व बालकांसाठीचा पोलीस हेल्पलाइन क्रमांक १०३ समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. च्त्यांची ही मागणी पोलीस आयुक्त पडसलगीकर यांनी मान्य केली आहे. त्यासाठी सर्व मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांशी मुंबई पोलीस चर्चा करतील, असे स्पष्ट आश्वासन पडसलगीकर यांनी दिले.>व्यवस्था लावण्यात येईल!पोलीस आयुक्त पडसलगीकर म्हणाले, टुरिस्ट व्हिसावर काम करण्यास कोणत्याही क्षेत्रात परवानगी नाही. त्यामुळे सिनेसृष्टीत जर कायद्याचे उल्लंघन होत असेल, तर ती गंभीर बाब आहे. हा गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून आम्ही एक नवीन व्यवस्था लावण्याचा निश्चितच प्रयत्न करू.