लोकमत न्यूज नेटवर्क/ लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तूर खरेदी केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना खरेदीचे टोकन देण्यात आले होते. हे टोकन असलेल्या शेतकऱ्यांची पूर्ण तूर खरेदी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र जिल्ह्यात तब्बल ३ हजार ५४० शेतकऱ्यांकडे हे टोकन असूनही त्यांच्याकडे अजूनही सुमारे ६५ हजार क्विंटल तूर पडून आहे.दरम्यान, तूर खरेदीबाबत अद्याप कुठलीही लेखी सूचना मिळाली नसल्याचे बाजार समिती आणि नाफेडकडून सांगण्यात येत असल्याने मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी तर नाही ना? अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ३४२ शेतकऱ्यांकडून एकूण २ लाख ११ हजार ८०९ क्विंटल तुरीची खरेदी झाली. यातील ७ हजार क्विंटल तूर अजूनही खरेदी केंद्रांवरच पडून आहे.
३,५४० शेतकऱ्यांची तूर घरीच
By admin | Published: July 07, 2017 4:14 AM