शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

‘सर्वांना घरे’ हाच केंद्रबिंदू राहणार

By admin | Published: April 17, 2016 1:37 AM

शहरे ही ‘आहे रे’ वर्गाबरोबर ‘नाही रे’ वर्गासाठीही राहण्याजोगी व परवडणारी असली पाहिजेत. शहरांचा विकास करताना तो सर्वसमावेशक असायला हवा; या दृष्टीने परवडणारी घरे उभारून ‘सर्वांसाठी घरे

मुंबई : शहरे ही ‘आहे रे’ वर्गाबरोबर ‘नाही रे’ वर्गासाठीही राहण्याजोगी व परवडणारी असली पाहिजेत. शहरांचा विकास करताना तो सर्वसमावेशक असायला हवा; या दृष्टीने परवडणारी घरे उभारून ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर भर दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह’चा समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. ब्रिक्सचे सदस्य असलेल्या ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, ब्राझीलच्या शिष्टमंडळाचे प्रमुख तोवर दा सिल्वा न्युन्स, रशियाच्या शिष्टमंडळाचे प्रमुख जॉर्जी पोल्टव्हचेन्को, दक्षिण आफ्रिकेतीेल शिष्टमंडळाचे प्रमुख सुभेश पिल्लई, केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव अलोक डिमरी, ‘मुंबई फर्स्ट’चे अध्यक्ष नरेंद्र नायर आदी उपस्थित होते. सेंट पीटर्सबर्ग शहरातील नदीची स्वच्छता, त्याचे व्यवस्थापन हे आदर्शवत आहे. मुंबईतील मिठी नदीची स्वच्छता आणि व्यवस्थापन करताना त्यांचा अनुभव आणि कल्पना उपयुक्त ठरतील. याकामी आम्ही त्यांची मदत घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्य सचिव क्षत्रिय म्हणाले की, एकाच वेळी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यामध्ये चीनमधील शांघाय शहराने चांगली कामिगरी केली आहे. मुंबईत या मॉडेलचा अवलंब करण्याबाबत त्यांचे मार्गदर्शन घेण्यात येईल. या परिषदेतून सहभागी देशांच्या प्रतिनिधींमध्ये विचार व संकल्पनांचे आदान- प्रदान झाले, त्याचा लाभ पाचही देशांतील शहरांना होणार आहे. ब्राझील देशातील शिष्टमंडळाचे प्रमुख तोवर दा सिल्वा न्युन्स म्हणाले की, शहरांचा विकास करताना पर्यावरणप्रिय होणे गरजेचे आहे. यासाठी सर्व ब्रिक्स शहरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)