शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव नाही, राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेनेतील उच्चस्तरीय सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 4:46 AM

देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत शुक्रवारी बोलावून घेतल्यावर आता त्यांचा राजीनामा येऊ घातलाय, अशी उत्कंठा निर्माण झाली होती. पवार यांच्या येथील जनपथ रस्त्यावरील निवासस्थानी दोघांमध्ये सकाळी प्रदीर्घ म्हणता येईल, अशी चर्चा झाली.

हरीश गुप्ता _नवी दिल्ली : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासंदर्भात अफवा व चर्चा होत असताना, ‘या क्षणाला’ तसा काही प्रस्ताव समोर नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील उच्च पातळीवरील सूत्रांनी म्हटले. (Home Minister Deshmukh's resignation is not proposed, according to high level sources in NCP-Shiv Sena)देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत शुक्रवारी बोलावून घेतल्यावर आता त्यांचा राजीनामा येऊ घातलाय, अशी उत्कंठा निर्माण झाली होती. पवार यांच्या येथील जनपथ रस्त्यावरील निवासस्थानी दोघांमध्ये सकाळी प्रदीर्घ म्हणता येईल, अशी चर्चा झाली. चर्चेनंतर बाहेर वार्ताहरांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, “मी पवार साहेबांना त्या प्रकरणी मुंबईतील घडामोडींची माहिती दिली.” विशेष म्हणजे, देशमुख यांनी “राज्य सरकार एनआयएला पूर्ण सहकार्य करीत आहे,” अशी सलोख्याची भूमिका घेतली होती. मात्र, ही भूमिका शिवसेनेच्या स्पष्ट भूमिकेच्या विसंगत आहे. शिवसेनेने या प्रकरणात एनआयए तपास हा राज्याच्या विषयांत हस्तक्षेप असल्याचे म्हटले होते.राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी ‘लोकमत’ला शुक्रवारी सायंकाळी सांगितले की, अनिल देशमुख यांना राजीनामा द्यायला लावण्यात काहीही राजकीय लाभ होणार नाही.  शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, “ पवार-देशमुख यांच्या भेटीचा वेगळा अर्थ लावण्याची गरज नाही. कारण तो त्यांचा अंतर्गत विषय आहे.”

आमचे लक्ष्य निवडणुका -भाजपभाजपमधील सूत्रांनी म्हटले की, आमच्या पक्षाचा सगळा भर हा पश्चिम बंगालमधील निवडणुकीवर असून, केंद्रीय नेतृत्वाला येते काही आठवडे काहीही करण्याची घाई नाही. “एनआयए व्यावसायिकपणे तिचे काम करीत असून, हत्या आणि खंडणीच्या घृणास्पद गुन्ह्यातील खऱ्याखुऱ्या अपराध्यांना पकडेल,” असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नजीक समजल्या जाणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार