मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रश्नांसंदर्भात राज्यसभेचे सदस्य छत्रपती संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील अन्य महत्वाच्या नेत्यांची भेट घेतली. संभाजीराजे यांनी सरकारला तीन पर्याय सुचविले आहेत. तसेच आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत समाजाच्या विकासासाठी पाच मागण्याही सरकारसमोर मांडल्या आहेत. त्यामुळे येत्या ६ जूनपूर्वी या मागण्यांवर ठोस कार्यवाही करावी, अन्यथा शिवराज्याभिषेकदिनी किल्ले रायगडावरून आंदोलनाची हाक देऊ. तेव्हा कोरोना वगैरे काही पाहणार नाही, असा इशाराही खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे. दरम्यान, यानंतर सरकार आपल्यावर पाळत ठेवत आहे, असं म्हणत संभाजीराजे यांनी गंभीर आरोप केले होते. यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे."छत्रपती संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता. यासंदर्भात माझी संभाजीराजेंशी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे," असं गृहमंत्री म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
छत्रपती संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 9:25 PM
आपल्यावर सरकार पाळत ठेवत आहे, असं संभाजीराजे यापूर्वी म्हणाले होते.
ठळक मुद्देआपल्यावर सरकार पाळत ठेवत आहे, असं संभाजीराजे यापूर्वी म्हणाले होते.