मुंबई : कर्णकर्कश आवाजाच्या हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणाबरोबर नागरिकांना त्रास होऊन आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी पोलीस व परिवहन विभागाच्या वतीने ‘नो हॉर्न डे’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गृह राज्यमंत्री (शहर) डॉ. रणजित पाटील यांनी बुुधवारी मंत्रालयाच्या परिसरातील रस्त्यावर उभे राहून वाहकांना आवाहन केले. त्यासंबंधी पत्रकाचे वाटप केले.वाहन चालकांकडून वाजविले जाणा-या हॉर्नमुळे सगळ्यांना त्रास होतो. आवश्यकता नसतानाही मोठ मोठे हॉर्न वाजविल्याने ध्वनिप्रदूषण होते, त्यामुळे त्याला प्रतिबंध घालण्यासाठी गृहराज्यमंत्री पाटील यांनी पुढाकार घेऊन ‘नो हॉर्न डे’ हा उपक्रम सुरू केला आहे. मुंबईतील परिवहन विभागाने या उपक्रमाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. रस्त्यात जागोजागी उभे राहून स्वत: अधिकारी वाहन चालकांना हॉर्न बंदीचे पत्रके देत आहेत. ध्वनी प्रदूषणमुक्त राज्य म्हणून महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे, असे अवाहन यावेळी डॉ. पाटील यांनी केले.
‘नो हॉर्न डे’साठी गृहराज्यमंत्री रस्त्यावर, पोलीस व आरटीओचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 9:13 PM