शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

विद्यार्थ्यांना दिला जाणार मतदानाचा ‘होमवर्क’!

By admin | Published: September 30, 2014 12:43 AM

मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा अकोला जिल्हा प्रशासनाचा फंडा.

संतोष येलकर/अकोला मतदानाच्या एक दिवस आधी, जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना कुटुंबातील सदस्यांच्या मतदानाबाबत गृहपाठ (होमवर्क) दिला जाणार आहे.विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या कामात विद्यार्थी हे उत्तम संदेशवाहक ठरत असल्याने विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत, मतदानाच्या एक दिवस आधी, म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना मतदानासंबंधी गृहपाठ दिला जाणार आहे. इयत्ता दुसरी ते इयत्ता बारावीमधील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकांकडून हा गृहपाठ दिला जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरात वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींची संख्या किती, मतदार यादीत किती जणांची नावे आहेत, घरात एकूण मतदार किती, त्यापैकी किती जणांनी मतदान केले, मतदान केंद्राचे नाव काय, म तदान करणार्‍यांची नावे अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून आणणे, अशा स्वरूपाचा हा गृहपाठ आहे. मतदानाच्या दुसर्‍या दिवशी, १६ ऑक्टोबर रोजी विद्या र्थ्यांचा गृहपाठ संबंधित शाळांमधील शिक्षकांकडून तपासण्यात येईल. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक बोलाविण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी अरूण शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची ही मोहिम आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मतदानासंबंधी ह्यहोमवर्कह्ण मध्ये सहभागी करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगीतले.