लोकमत न्यूज नेटवर्कमोहोपाडा : कांबे गावातील इस्त्रीवाल्याने प्रामाणिकपणे एका महिलेचे दुकानालगत पडलेले दागिने परत के ले. यामुळे नागरिकांकडून त्या इस्त्रीवाल्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.कांबे गावातील अर्पिता कुरंगले या कार्यक्रमाला जायचे असल्याने आपल्या नवऱ्याचा शर्ट इस्त्रीसाठी घेऊन घराबाहेर पडल्या. यावेळी कांबा पाटीजवळील राजू कन्नोजिया या इस्त्रीवाल्याच्या दुकानात शर्ट देण्यासाठी अर्पिता यांनी आपल्या बॅगेतून शर्ट बाहेर काढून दिला. यावेळी त्यांच्या बॅगमध्ये गंठण व हार असे बारा तोळ्याचे दागिने पिशवीत गुंडाळून ठेवलेले होते. शर्ट काढताना दागिन्यांची पिशवी दुकानालगतच पडली. हे अर्पिता यांच्या लक्षात आले नाही. हळद समारंभाला सांगडे गावाला जायचे असल्याने त्या मिनीडोर रिक्षात बसून निघून गेल्या. हळदी समारंभाला गेल्यानंतर त्यांनी आपली बॅग उघडली. यावेळी बॅगमध्ये दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी अर्पिता घाबरल्या. त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली, पण दागिने मात्र सापडले नाहीत. दुसऱ्या दिवशी इस्त्री दुकानदाराने आपले दुकान उघडले. यावेळी दुकानाच्या बाजूचा कचरा साफ करीत असताना राजू कन्नोजियाचे लक्ष एका पिशवीकडे गेले. त्यांनी ती पिशवी उचलून उघडून पाहिली असता त्यात बारा तोळे सोन्याचे दागिने असल्याचे राजूला आढळले. यावेळी राजूने त्वरित अर्पिता अरुण कुरंगले यांचे घर गाठले व त्यांचे दागिने त्यांना सुपूर्द केले.
इस्त्रीवाल्याचा प्रामाणिकपणा
By admin | Published: May 11, 2017 2:04 AM