शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

रणरागिणींच्या वेदनेचा हुंकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 4:34 AM

आझाद मैदानावर बुधवारी भगवा जनसागर लोटला होता. मराठा समाजावरील अन्यायाला वाचा फोडणारी रणरागिणींची भाषणे झाली, त्यांचा हुंकार पाहायला मिळाला.

सचिन लुंगसे मुंबई : आझाद मैदानावर बुधवारी भगवा जनसागर लोटला होता. मराठा समाजावरील अन्यायाला वाचा फोडणारी रणरागिणींची भाषणे झाली, त्यांचा हुंकार पाहायला मिळाला. आम्ही आज येथे न्याय मागण्यास आलेलो नाही तर न्याय घेण्यास आलो आहोत, असे सांगत त्यांनी मैदान दणाणून सोडले. आर्या माने, प्रचिती सावंत, वैष्णवी डाफ, पूजा मोरे, स्नेहल सपताळ, भावना देशमुख, काजल गुंजाळ, अर्चना भोर, रसिका शिंदे, दिव्या महाले, दिव्या साळुंखे, आकांक्षा पवार आणि सुरेखा गावकर यांनी समाजाची भावना बोलून दाखविली.प्रारंभी मराठा मोर्चाच्या प्रस्तावनेचे वाचन झाले. कोपर्डी प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि तातडीने न्याय दिला जाईल, असे आश्वासन सरकारने दिले होते. त्याचे काय झाले, असा सवाल एक तरुणीने केला. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. मात्र सरकार काहीच कार्यवाही करत नाही. अत्याचारासारख्या प्रकरणांत जात, धर्म आणि पंथ पाहता कामा नये. केवळ कोपर्डीच नाही, तर अत्याचाराच्या घटनेत आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आजघडीला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला जात आहे. चुकीच्या प्रकरणांत लोकांना गोवले जात आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. अशा घटनांचे राजकारण करता कामा नये. मात्र याप्रश्नी सरकार गंभीर नाही.सरकार म्हणते कायद्याचे राज्य आहे. जर कायद्याचे राज्य असेल तर मग आम्हाला न्याय का मिळत नाही? कायदा नक्की कुठे आहे? दिलेले वचन सरकार का पाळत नाही? मराठा समाज उदारमतवादी आहे. मात्र आमचा गैरफायदा घेऊ नका. आज आम्ही मुंबईत धडकलो आहोत. आणि आता जर आमची दखल घेतली नाही, तर मग आम्ही दिल्ली हादरवून टाकू, असा इशारा त्यांनी दिला.आता अभ्यास बंद करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणतेही प्रकरण दाखल केले की आम्ही अभ्यास करून हा प्रश्न सोडवू, असे ते म्हणतात. मात्र आणखी किती दिवस तुम्ही अभ्यास करणार. तुमचे गुरुजी नक्की आहेत तरी कोण? असा सवाल एका मुलीने केला.आम्ही जिजाऊच्या लेकीआम्ही जिजाऊच्या लेकी आहोत. आम्ही शांत आहोत. मात्र जर आम्ही मनात आणले आणि आक्रमक झालो तर मात्र सरकारला महाग पडेल, असाही इशारा एका संतप्त मुलीने दिला.‘एक मराठा, लाख मराठा’प्रत्येकाच्या भाषणाचा शेवट ‘एक मराठा, लाख मराठा...’ने होत होता. ‘मराठा समाजाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका...’ या वाक्यावर उपस्थित समुदायाकडून टाळ्यांचा गजर झाला.शिवस्मारकाचे काय झालेशिवस्मारकाच्या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र त्यानंतर कामाबाबत सरकारने एक शब्द काढलेला नाही. नक्की काम सुरू झाले आहे का? आणि सुरू झाले असेल तर किती झाले आहे? याबाबत सरकार काहीच बोलत नाही. शिवस्मारकाचे काम लवकर करण्यात यावे, असाही मुद्दा एका मुलीने उपस्थित केला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा