शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

हनीसिंग हाजीर हो..

By admin | Published: January 09, 2015 12:52 AM

पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगला बयान देण्यासाठी १३ जानेवारी रोजी पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित होण्याचे आदेश सत्र न्यायालयाने गुरुवारी दिलेत.

नागपूर : पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगला बयान देण्यासाठी १३ जानेवारी रोजी पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित होण्याचे आदेश सत्र न्यायालयाने गुरुवारी दिलेत. हनीसिंगने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी, तर तक्रारकर्ते आनंदपालसिंग जब्बल यांनी हनीसिंगला अटकपूर्व जामीन देऊ नये यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दोन्ही अर्जांवर गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, त्यांनी संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर हनीसिंगला पाचपावली पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिलेत. हनीसिंगला सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. हा आदेश पुढील तारखेपर्यंत लागू राहणार आहे.जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व नवी दिल्ली येथील बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पाचपावली पोलीस तक्रार नोंदविल्यापासून हनीसिंगला अटक करण्याच्या प्रयत्नात आहेत. हनीसिंगतर्फे अ‍ॅड. अतुल पांडे, जब्बल यांच्यातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू व अ‍ॅड. पवन डेंगे यांनी बाजू मांडली. शासनातर्फे सहायक सरकारी वकील उषा गुजर यांनी बाजू मांडली़ (प्रतिनिधी)बादशाहची हजेरीअश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेला गायक बादशाहने ६ जानेवारी रोजी पाचपावली पोलीस ठाण्यात हजेरी लावून बयान नोंदविले आहे. तो हनीसिंगचा मित्र आहे. बादशाहचे मूळ नाव आदित्य असून त्याचा जन्म दिल्लीत झाला आहे. त्याची गाणी तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. शाहरुख खान त्याचा आवडता अभिनेता आहे. तसेच तो राजाप्रमाणे जगतो. यामुळे हनीसिंगने त्याला बादशाह नाव दिले. तेव्हापासून तो बादशाह नावाने वावरत आहे.