मुंबई/ नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ८४१ पोलीस कर्मचाऱ्यांचा त्यांचे शौर्य आणि प्रशंसनीय कामाबद्दल पोलीस पदक बहाल करून गौरव केला जाणार आहे. त्यात महाराष्ट्रातील ५० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.राष्ट्रपती पोलीस पदकासाठी (पीपीएमजी) ३, पोलीस पदकासाठी (पीएमजी) १२१, उत्कृष्ट सेवेबद्दलच्या राष्ट्रपती पोलीस पदकासाठी ८९ आणि विशेष सेवेबद्दलच्या पोलीस पदकासाठी ६२८ पोलिसांनी निवड करण्यात आली आहे. पुरस्कार विजेत्यामध्ये मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी, नागपूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक रवींद्र कदम, विक्रीकर विभागातील मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर, मुंबईतील पश्चिम विभागाचे अप्पर आयुक्त छेरिंग दोरजे, सहायक आयुक्त शशीकांत सुर्वे, ठाण्यातील सहायक आयुक्त नागेश लोहार आदींचा समावेश आहे.महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर लढणाऱ्या पाच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘पोलीस शौर्य’ पदक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये विशेष कृती दलातील सहायक पोलीस निरीक्षक मनोहर हिरालाल कोरेटी, पोलीस हवालदार चंद्रय्या गोदारी, नाईक पोलीस शिपाई गंगाराम मदनय्या सिडाम, नाईक पोलीस शिपाई नागेश्वर नारायण कुमराम, पोलीस शिपाई बापू किष्टय्या सूरमवार या ५ जणांचा समावेश आहे.उपआयुक्त : संजय जांभुळकर (हत्यार विभाग, मरोळ), जानकीराम डाखोरे (समादेशक, राखीव दल क्र. ९, अमरावती)निरीक्षक : प्रकाश कुलकर्णी (एसीबी, औरंगाबाद), रशिद तडवी (राखीव दल क्र. ६, धुळे), सुभाष दगडखैर (हत्यार विभाग, नायगाव, मुंबई), सतीश क्षीरसागर (राखीव दल क्र.१, मुंबई), सुरेखा दुग्गे (राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई)सहायक निरीक्षक : श्यामकांत पाटील (औरंगाबाद शहर), उपनिरीक्षक विष्णू बडे, सखाराम रेडेकर (दोघे गुन्हे शाखा, मुंबई), हणुमंत सुगांवकर (पुणे शहर), रतन मांजरेकर (वाहतूक नियंत्रण शाखा, मुंबई), एकनाथ केसरकर (टिळकनगर पोलीस ठाणे, मुंबई), बाळासाहेब देसाई (कुर्ला), चंद्रकांत पवार (बोरीवली), राजेंद्र झेंडे (गुप्त वार्ता विभाग, जळगाव), राजेंद्र होटे (मंगळूर, अमरावती), सहायक फौजदार भास्कर वानखेडे (नागपूर शहर), भगवंत तापसे (बीड), वसंत सारंग (नागपाडा, मुंबई), लियाकत अली खान (भंडारा), सुभाष रणावरे (राखीव दल, क्र. २ पुणे), दिलीप भगत (एसीबी, उस्मानाबाद), श्यामवेल उजागरे (राखीव दल, क्र.५, दौंड), अरुण बुधकर (पिंपरी चिंचवड), अरुण पाटील (बीडीडीएस, जळगाव), मोतीलाल पाटील (ठाणे शहर), भरत सोनावणे (राखीव दल, पुणे), मधुकर भागवत, सतीश जामदार (दोघे, राखीव दल क्र. ५, दौंड), हिंमत जाधव (राखीव दल, क्र. ७, दौंड), राजेंद्र पोहरे (विशेष शाखा, पुणे शहर)हवालदार : प्रकाश ब्रह्मा (वायरलेस, पुणे), संभाजी पाटील (राखीव दल क्र. २ पुणे), प्रदीप कडवाडकर (हत्यार विभाग, वरळी), बबन अधारी (वायरलेस, पुणे), विठ्ठल पाटील (सांगली मुख्यालय), अशोक रोकडे (एटीएस, मुंबई), तुकाराम बंगार (कापूरवाडी, ठाणे शहर)
महाराष्ट्रातील ५० पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान
By admin | Published: January 26, 2016 3:17 AM