शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचा सेना पदकाने झाला होता सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 5:38 AM

उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद झालेले महाराष्ट्राचे वीरपूत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (२९) यांचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सेना पदकाने सन्मान करण्यात आला होता.

मीरा रोड (ठाणे) : उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद झालेले महाराष्ट्राचे वीरपूत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (२९) यांचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सेना पदकाने सन्मान करण्यात आला होता.मीरा रोडच्या शीतल नगरमधील हिरलसागर इमारतीत पहिल्या मजल्यावर राणे कुटुंब राहते. ते मूळचे कोकणातील वैभववाडीतील सडूरे गावाचे आहेत. १९८७ पासून ते मीरा रोडमध्ये स्थायिक झाले. मेजर कौस्तुभ याच भागात लहानाचे मोठे झाले. येथील होली क्र ॉस शाळेचे ते विद्यार्थी होते. त्यांचे वडील राणे काका म्हणून परिचित आहेत. वडील दूरसंचार विभागातून तर आई ज्योती या मालाडच्या उत्कर्ष शैक्षणिक संस्थेतून शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत.मंगळवारी सकाळीच त्यांची आई गावाला जाण्यास निघाली होती. पण सकाळीच सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाल्याची बातमी आली. त्याची माहिती मिळताच त्यांची आई पनवेलवरूनच माघारी फिरली.२०१०मध्ये कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चेन्नई येथून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. २०११मध्ये ते सैन्यात लेफ्टनंट पदावर रु जू झाले. २०१३ मध्ये त्यांना कॅप्टनपदी तर २०१८ मध्ये मेजरपदी बढती मिळाली.३६ व्या बटालियनमध्ये असणारे मेजर कौस्तुभ सध्या उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये तैनात होते.>आज पार्थिव आणणारमेजर कौस्तुभ यांचे पार्थिव बुधवारी विशेष विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. त्यानंतर मीरा रोड येथील त्यांच्या निवासस्थानी ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.पाकिस्तानला धडा शिकवामेजर कौस्तुभ राणे यांचे हौतात्म्य वाया जाऊ देता कामा नये. असे पराक्रमी लष्करी अधिकारी आणि जवान गमावणे परवडणार नाही. सीमेवर सतत कुरापती काढणारे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना केंद्र सरकारने कायमचा धडा शिकवला पाहिजे, असे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद