पनवेल : ‘लोकमत’ पनवेल कार्यालयाच्या दुसऱ्या वर्धापन दिनी सखींनी आपल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. वन्स मोअरने नाट्यगृह दणाणून गेले होते. यावेळी महिला सशक्तीकरण आणि सबलीकरणात सहभाग घेतल्याबद्दल १० सखींना शक्तिपीठ पुरस्कार देऊन ‘लोकमत’ परिवारातर्फेगौरविण्यात आले. ‘लोकमत’च्या पनवेल कार्यालयाचा द्वितीय वर्धापन दिन गुरु वारी क्र ांतिवीर वासुदेव फडके नाट्यगृहात सायंकाळी ४ वाजता साजरा करण्यात आला. यावेळी साहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला, आर. बालचंदर, कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, माजी नगरसेवक सुरदास गोवारी, माजी नगरसेविका नीता माळी, शंकर चव्हाण विद्यालयाचे अध्यक्ष प्रमोद चव्हाण, अरु ण भिसे व वृतपत्र विक्रेते शिवाजी दांगट उपस्थित होते. विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करताना, आपल्या जवळच्या महिलांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे वर्धापनदिनी पनवेल तालुक्यातील महिलांचा गौरव करण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी विनायक पात्रुडकर यांनी सांगितले. अनेक कर्तृत्ववान महिला तालुक्यात काम करीत असून, त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि भविष्यातील त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी १० महिलांची शक्तिपीठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘सखी धमाल’ कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या ग्रुप डान्स स्पर्धेत १५ ग्रुप सहभागी झाले होते. सखींच्या नृत्य कौशल्याने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. सखींचा उत्साह व जोश पाहून वन्स मोअरने नाट्यगृह दणाणून गेले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता विघ्नेश जोशी यांनी केले. रशियातील अनापा येथे २१ ते २५ सप्टेंबर २०१६ या कालावधीत झालेल्या ६ व्या वर्ल्ड कप डायमंड ‘किक बॉक्सिंग’ स्पर्धेत आठ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. यावेळी मार्गदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारे प्रशिक्षक मंदार पनवेलकर यांना सन्मानपत्र देऊन सपत्नीक गौरविण्यात आले. नृत्य स्पर्धेत सानपाड्याच्या हिरकणी ग्रुपने प्रथम, सुषमा पाटील विद्यालय कामोठेने द्वितीय तर संस्कृती महिला मंडळ, जुईनगर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून बेलापूरच्या नृत्य कला अकादमीच्या सुहासिनी राहुल पाडळे व अभिनेते सोमनाथ हजारे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.‘लोकमत’ सखी सदस्यांसोबत समन्वय तसेच सदस्यवाढीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या ४२ सखींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पनवेल कार्यालयाचे वरिष्ठ व्यवस्थापक सागर गवांडे, जाहिरात प्रमुख विनोद भांडारकर, रायगडचे शाखा प्रमुख समीर कुलकर्णी यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
शक्तिपीठ पुरस्काराने सखींचा सन्मान
By admin | Published: October 08, 2016 1:51 AM