शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

म्हाडाची बोगस साइट बनविणारा गजाआड

By admin | Published: April 24, 2015 1:56 AM

म्हाडाचे बनावट संकेतस्थळ बनवून त्याद्वारे अनेकांची फसवणूक करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनीअरला सायबर पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतून गजाआड केले

मुंबई : म्हाडाचे बनावट संकेतस्थळ बनवून त्याद्वारे अनेकांची फसवणूक करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनीअरला सायबर पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतून गजाआड केले. राजेशकुमार तिवातिया (२७) असे आरोपीचे नाव असून, त्याने गेल्या दीडेक वर्षात ७०हून अधिक शासकीय, खासगी संस्थांची बनावट संकेतस्थळे तयार केल्याची माहिती सायबर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे.मुंबईतल्या घरांच्या सोडतीची जाहिरात नुकतीच म्हाडाने सर्व वृत्तपत्रांमध्ये दिली होती. सोडतीतली घरे मिळविण्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर अर्ज येणार होते. मात्र या अधिकृत संकेतस्थळासोबत एक बोगस पण हुबेहूब संकेतस्थळ आहे आणि त्यावर असंख्य अर्ज येऊन पडत आहेत ही माहिती मिळताच म्हाडाने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. एसीबी नंदकिशोर मोरे, वरिष्ठ निरीक्षक सुनील घोसाळकर आणि पथकाने या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला. तपासात हे संकेतस्थळ दिल्लीतून हाताळण्यात येत असल्याची माहिती मिळताच सायबर पोलिसांचे एक पथक तेथे रवाना झाले. त्यांनी राजेशकुमारच्या मुसक्या आवळल्या. चौकशीत त्याने याशिवाय आणखीही अनेक बोगस संकेतस्थळे तयार केल्याची कबुली दिली. जास्त हिट्स मिळणाऱ्या संकेतस्थळांना गुगलकडून जाहिराती दिल्या जातात. जाहिरातीद्वारे पैसे कमावण्याच्या नादात त्याने हा गुन्हा केल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, या प्रकरणात त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी)