पुणे : जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत असून तिकडून येणाºया थंड वा-यामुळे राज्यातील गारठा कमालीचा वाढला आहे. गेल्या तीन-चार दिवसांत झपाट्याने उतरलेला तापमानाचा पारा गुरुवारी आणखी खाली गेला. गोदाकाठी निफाडला ४.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे़ विदर्भातील अनेक शहरांमधील किमान तापमानात एकाच दिवसात ३ ते ४ अंश सेल्सिअसने घट झाली, तर मराठवाड्यात २ ते ५ अंश सेल्सिअसने पारा उतरला आहे़ पुणे शहरातील किमान तापमानाचा पारा पुन्हा १० अंशांच्या खाली घसरला़मुंबईतही किमान तापमान १५.१ अंश सेल्सिअस एवढे खाली आले आहे.
हुडहुडी : राज्यातील तापमानाचा पारा आणखी घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 3:07 AM