शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

राज्याला हुडहुडी

By admin | Published: December 06, 2014 3:22 AM

उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याने चांगलाच वेग पकडल्याने राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान घसरले आहे

मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याने चांगलाच वेग पकडल्याने राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान घसरले आहे. शुक्रवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नांदेड येथे १० अंश सेल्सिअस एवढे नोंदविले असून, राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमानदेखील ११ ते १२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असल्याने राज्याला हुडहुडी भरली आहे.नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी राज्यातील प्रमुख शहरांसह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली घसरला होता. मात्र मध्यंतरी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्याला अडथळा निर्माण झाला होता. परिणामी राज्यातील प्रमुख शहरांच्या किमान तापमानात वाढ झाली होती. परंतु आता पुन्हा थंड वाऱ्याचा जोर वाढला आहे. मुंबई शहरात मात्र दिवसा चटके देणारे ऊन आणि रात्री गारवा, असे दुहेरी वातावरण अनुभवास येत आहे. शिवाय गेल्या दोन दिवसांत मुंबईच्या किमान तापमानात ३ अंशांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी शहराचे किमान तापमान तापमान २३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले आहे. (प्रतिनिधी)