शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

हुक्का पार्लरची जाहिरातबाजी

By admin | Published: June 27, 2017 3:02 AM

स्मोकिंग किल्स बट हुक्का चिल्स, दोन पॉटवर एक मोफत, या आॅफरच्या जाहिराती इन्स्टाग्रॅमसह सोशल मीडियावर झळकू लागल्या आहेत

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्मोकिंग किल्स बट हुक्का चिल्स, दोन पॉटवर एक मोफत, या आॅफरच्या जाहिराती इन्स्टाग्रॅमसह सोशल मीडियावर झळकू लागल्या आहेत. नियम धाब्यावर बसवून हुक्का पार्लरचे चालक बिनधास्तपणे जाहिरातबाजी करून तरुणाईला व्यसनांच्या जाळ्यात अडकवत आहेत. रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या व्यवसायावर पोलीस, महापालिका व अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी कडक कारवाई करत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनधिकृत हुक्का पार्लरविरोधात ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले होते; परंतु ही कारवाई दिखाव्यापुरतीच असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये बिनधास्तपणे हुक्का पार्लर सुरू आहेत. तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करण्यास मज्जाव असताना हुक्का पार्लरच्या बाहेर बिनधास्तपणे होर्डिंग लावून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. हुक्का पार्लरमध्ये जाणाऱ्यांमध्ये तरुणाईची संख्या ९५ टक्के आहे. महाविद्यालयीन तरुण विशेषत: ११वी व १२वीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लरमध्ये जात असल्याचेही निदर्शनास येऊ लागले आहे. पूर्वी वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये पार्टीची मागणी केली जात होती. आता हॉटेलऐवजी हुक्का पार्लरला पसंती दिली जाऊ लागली आहे. हे लक्षात घेऊन हुक्का पार्लरच्या चालकांनी सोशल मीडियावरून जोरदार जाहिरातबाजी सुरू केली आहे. नेरुळमधील शानदार नेही इन्स्टाग्रामद्वारे तरुणाईला आमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे. स्मोकिंग किल्स बट हुक्का चिल्स. रमझान निमित्त आॅफर १ पॉट ३०० रुपये, दोन पॉटर ६०० रुपये, बाय टू अ‍ॅण्ड गेट वन फ्री, ग्रॅब युवर हुक्का अ‍ॅट शानदार ही जाहिरात तरुणाईला आकर्षित करत आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून तरुणाईला आमंत्रणे देण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी वयोगटाप्रमाणे वेळ निश्चित करून दिली आहे. नेरुळमधील एका हुक्का पार्लरमध्ये ११ व १२वीमधील विद्यार्थ्यांसाठी दुपारी १ ते ३ वाजेपर्यंतची वेळ ठेवण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत युवक-युवती हुक्का पार्लरमध्येच असल्याचे चित्र दिसू लागले आहे. महाविद्यालयीन तरुणाई पूर्णपणे हुक्काच्या अधीन जाऊ लागली आहे. तरुणाईला हुक्का ओढणे प्रतिष्ठेचे वाटू लागले आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून हुक्का ओढतानाचे फोटो व व्हिडीओ इतर मित्रांना पाठविण्यास सुरुवात केली आहे. महाविद्यालयामध्ये हुक्का पार्लरविषयी उघडपणे चर्चा सुरू आहे. तरुणाई व्यसनांच्या आहारी जात असून हे थांबविण्यासाठी पोलिसांनी नियमबाह्यपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.