त्यानं पहिला डोस घेतल्याचं सर्टिफिकेट दाखवलं अन् आम्ही...; तन्मय फडणवीसला दुसरा डोस देणाऱ्या NCIचा सावध पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 02:06 PM2021-04-20T14:06:37+5:302021-04-20T14:11:27+5:30

Tanmay Fadnavis : पात्र नसतानाही कोरोनाची लस घेतल्यानं काँग्रेसनं केली होती टीका. टीकेनंतर रुग्णालय प्रशासनानंही दिलं स्पष्टीकरण

hospital clarification on tanmay fadnavis coronavirus vaccine second dose devendra fadnavis congress allegation | त्यानं पहिला डोस घेतल्याचं सर्टिफिकेट दाखवलं अन् आम्ही...; तन्मय फडणवीसला दुसरा डोस देणाऱ्या NCIचा सावध पवित्रा

त्यानं पहिला डोस घेतल्याचं सर्टिफिकेट दाखवलं अन् आम्ही...; तन्मय फडणवीसला दुसरा डोस देणाऱ्या NCIचा सावध पवित्रा

Next
ठळक मुद्दे पात्र नसतानाही कोरोनाची लस घेतल्यानं काँग्रेसनं केली होती टीका.टीकेनंतर रुग्णालय प्रशासनानंही दिलं स्पष्टीकरण

एकीकडे रेमडेसिवीरच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस यानं ‘कोरोना’ची लस घेतल्याचा फोटो ‘व्हायरल’ झाला होता. त्याचं वय ४५ च्या वर नसतानादेखील त्याला लस कशी काय मिळाली, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान, यानंतर आता नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या (एनसीआय) प्रशासनाकडूनही सावध पवित्रा घेण्यात आला आहे.
 
सोशल मीडियावर तन्मय फडणवीस याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तन्मय फडणवीसनं ही पोस्ट डिलीट केली होती. या वादानंतर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी स्पष्टीकरण देताना तन्मय फडणवीसनं आपल्याकडे केवळ दुसरा डोस घेतल्याचं म्हटलं. "तन्मय फडणवीस यानं मुंबईतील सेव्हन हिल्स या रुग्णलायात पहिला डोस घेतला. त्यानं कोणत्या निकषांनुसार तो घेतला याची कल्पना नाही. त्यानं आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यावर आमच्या सेंटरमध्ये त्याला दुसरा डोस देण्यात आला," असं जोगळेकर यांनी नमूद केलं. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 



काँग्रेसनं केली होती टीका

तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय २५ वर्षांहून अधिक नाही. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला. रात्री ‘इन्स्टाग्राम’वरून तो ‘फोटो’ हटविण्यात आला, मात्र तोपर्यंत अनेकांनी ‘स्क्रीनशॉट्स’ घेऊन ठेवले होते. यावरून काँग्रेसने फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं होतं. ४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट असतानादेखील फडणवीसांच्या पुतण्याला लस मिळाली. भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा, मग इतर लोक काय किड्यामुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसने ‘टि्वटर’वर उपस्थित केला.

Web Title: hospital clarification on tanmay fadnavis coronavirus vaccine second dose devendra fadnavis congress allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.