शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

एक इस्पितळ असेही!

By admin | Published: February 03, 2015 1:03 AM

अर्धवट उघडलेले, गंजलेल्या लोखंडी द्वाराच्या आत प्रवेश करताच मोठे भकास चित्र नजरेस भिडते. याच इमारतीत औषधाचे दुकान, बाह्यरुग्ण विभागाचा गंज लागलेला फलक टांगलेला आहे. काऊंटरही आहे.

ना रुग्ण, ना डॉक्टर : नागरिक सहकारी रुग्णालय झाले भकासराजीव सिंह - नागपूर अर्धवट उघडलेले, गंजलेल्या लोखंडी द्वाराच्या आत प्रवेश करताच मोठे भकास चित्र नजरेस भिडते. याच इमारतीत औषधाचे दुकान, बाह्यरुग्ण विभागाचा गंज लागलेला फलक टांगलेला आहे. काऊंटरही आहे. येथे विविध उपचाराच्या शुल्काचेही फलक आहेत. इमारतीच्या आत प्रवेश करताच जागोजागी तुटलेल्या भिंती, खोल्यांतील फाटलेले पडदे दिसतात. हे वाचून कुठली तरी जर्जर इमारत असावी, असा जर तुमचा अंदाज असेल तर तसे नाही, एकेकाळी शहरातील प्रतिष्ठित असलेल्या इस्पितळाची ही इमारत आहे. नागरिक सहकारी रुग्णालय, असे त्या इस्पितळाचे नाव.नोव्हेंबर २०१३ पासून हे इस्पितळ बंद आहे. पूर्वी या इस्पितळात गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेपासून गंभीर रुग्णांवर उचपार केले जायचे. इस्पितळाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज २० ते २५ रुग्ण यायचे. ६५ खाटांच्या या इस्पितळात सुमारे २० डॉक्टर आणि १५-२० कर्मचारी आपली सेवा देत होते.इस्पितळाच्या दुर्दशेमुळे ९० टक्के कर्मचारी व परिचारिकांनी ‘व्हीआरएस’ घेतला. असे असतानाही १० टक्के कर्मचारी व संचालक मंडळाला एक दिवस या इस्पितळाचे जुने दिवस पुन्हा परत येतील, ही आशा आहे. या इस्पितळात आजही काही कर्मचारी तैनात असतात. त्यांना विचारल्यावर त्यांनी इस्पितळ सुरू असल्याचे सांगितले. फक्त बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग बंद असल्याचे ते म्हणाले.बंद पडले इस्पितळ१९७० मध्ये इस्पितळ सुरू करण्याच्या हालचालीला वेग आला. ६६ हजार वर्गफूट परिसरात पसरलेले हे इस्पितळ अलंकार चित्रपटगृहाच्यासमोर आहे. इस्पितळ सुरू झाल्यापासूनच तोट्यात आहे. यामुळेच संचालक मंडळाने याला सहकारी योजनेच्या आधारावर चालविण्याची योजना २०१० मध्ये तयार केली. संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर २०१२ मध्ये यासाठी ग्लोबल टेंडर काढण्यात आले. एक वर्षाच्या प्रक्रियेनंतर अर्नेजा हॉस्पिटल प्रा. लिमिटेडसोबत करार झाला. परंतु यादरम्यान जनहित याचिकेमुळे करार थांबला. आता हे प्रकरण सुप्रीम कार्टात असून, सुनवाणी सुरू आहे. समृद्ध इतिहास१९७५ मध्ये नागरिक सहकारी रुग्णालय सोसायटीद्वारा संचालित या इस्पितळात रुग्ण भरती सेवा सुरू झाली. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, माजी जलसंपदा मंत्री वसंतरावदादा पाटील व माजी आरोग्य मंत्री प्रगती पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी इस्पितळाचे संचालक मंडळाचे अध्यक्ष नाशिकराव तिरपुडे उपस्थित होते. इस्पितळ सुरू करण्याचा उद्देश माफक दरात औषधोपचार करण्याचा होता. २५ सदस्यांच्या संचालक मंडळात डॉक्टर, समाजसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर होते. सध्या मंडळाचे अध्यक्ष अनंतराव घारड हे आहेत.