पुणो : पावसाने ओढ दिल्याने आणि धरणात तुटपुंजा पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पुणो महापालिकेने शहरात पाणीकपात केली आहे. यामुळे पुणोकर मेटाकुटीला आलेले असतानाच, पाणीकपातीच्या झळा रुग्णालयांनाही बसू लागल्या आहेत. पालिकेच्या रुग्णालयांत, प्रसूतिगृहांमध्ये पाणी नसल्यामुळे शस्त्रक्रिया व रुग्णांच्या उपचारावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. टँकरद्वारे पाणी मिळविण्यासाठी रुग्णालयातील कर्मचा:यांवर हात पसरण्याची वेळ आली आहे.
पालिकेची शहरात 2 रुग्णालये, 14 प्रसूतिगृहे आणि 51 दवाखाने आहेत. सर्व रुग्णालये व प्रसूतिगृहे दररोज रुग्णांनी भरलेली असतात. येथे दररोज शस्त्रक्रिया होत असल्याने पाण्याची आवश्यकता असते. मात्र, पालिकेने पाणीकपात सुरू केल्याने रुग्णालयांनाही दिवसाआड कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे प्रत्यक्षात आवश्यक असलेले पाणीच रुग्णालयांना मिळत नसल्याचे चित्र आहे. पाणी नसल्याचा परिणाम शस्त्रक्रियांवरही जाणवू लागला आहे. प्रामुख्याने प्रसूतीच्या शस्त्रक्रियांदरम्यान पाण्याची अधिक आवश्यकता लागते. त्यामुळे रुग्णालयांत पाणी आणण्यासाठी तेथील कर्मचारी आणि डॉक्टरांना धावपळ करावी लागत आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व रुग्णालये, प्रसूतिगृहे आणि दवाखान्यांना पाण्याची आवश्यकता भासल्यास टँकरद्वारे पाणी मागण्यास सांगितले आहे. त्यानुसार रुग्णालये टँकरची मागणी करीत आहेत. मात्र, एकदा फोन केल्यानंतर टँकर येत नसल्याच्या तक्रारी काही रुग्णालयांमधील कर्मचा:यांनी सांगितल्या. पाणी नाही तर रुग्णांचे हाल, हा विचार करून कर्मचा:यांवर पाणी मिळविण्यासाठी हात पसरण्याची वेळ आली आहे. टँकरसाठी सारखे फोन केल्यानंतर एखादा पाण्याचा टँकर येत असल्याचे चित्र काही रुग्णालयांमध्ये आहे.
पिण्याच्या पाण्याचीही बोंब
रुग्णालयांमध्ये पिण्यासाठी रुग्णांसह डॉक्टर आणि कर्मचा:यांनाही पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे घरातून बाटीलमध्ये पाणी भरून आणण्याची वेळ या सर्वावर आली आहे. पाणी संपले तर पिण्यासाठी पाणीच उपलब्ध होत नसल्याचे काही रुग्णालयांमध्ये दिसून येत आहे.
फोन केल्यावरही
टॅँकर नाही
4पाणी नाही तर रुग्णांचे हाल, हा विचार करून कर्मचा:यांवर पाणी मिळविण्यासाठी हात पसरण्याची वेळ आली आहे. टँकरसाठी सारखे फोन केल्यानंतर एखादा पाण्याचा टँकर येत असल्याचे चित्र काही रुग्णालयांमध्ये आहे.
टँकरद्वारे पाणी
पुरवठय़ाचा प्रयत्न
शहरात पाणी कपात केली असून, त्यात रुग्णालयांचाही समावेश आहे. यामुळे पालिकेच्या रुग्णालयांनाही एक दिवसाआड पाणी मिळत आहे. ज्या रुग्णालयांना हे पाणी पुरणार नाही, त्यांनी पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणी देण्याची मागणी करावी,
असे आम्ही प्रत्येक रुग्णालय, प्रसूतिगृह
आणि दवाखान्यांना सांगितले आहे. कमला नेहरू रुग्णालयात शनिवारी पाणी नसल्याने आम्ही तत्काळ पाणीपुरवठा विभागाकडून टँकरची मागणी करून ते तेथे पाठवून दिले होते. मात्र, इतर कोणत्याही रुग्णालयाकडून अजून आमच्याकडे पाणी नसल्याची तक्रार आलेली नाही.
- डॉ. सुनील तोरे
सहायक आरोग्य प्रमुख, पुणो महापालिका