जितेंद्र कालेकर / ठाणेरुग्णांंच्या बिलांसाठी सध्या सुट्या पैशांची चणचण असताना धनादेश स्वीकारण्याचे राज्य सरकारचे आदेश असताना येथील काही खासगी रुग्णालये धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) घेत आहेत. दिलेला धनादेश पुरेसे पैसे नसल्यास बाउन्स होण्याचा धोका असल्याने रुग्णालयांनी ही शक्कल लढवली आहे.नोटा रद्द झाल्याच्या फटका कोणत्याही रुग्णाला बसू नये म्हणून रुग्णालय, मेडिकल स्टोअर्सनी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत २४ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. तसेच नव्या नोटा उपलब्ध नसलेल्यासांठी रुग्णालयांनी धनादेश स्वीकारण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत. यामध्ये १० हजारांपर्यंतच्या धनादेशाची जबाबदारी सरकारकडून घेतली जाणार आहे. ठाण्यातील खासगी रुग्णालयांत अल्पकाळाकरिता दाखल झाले तरी हजारो रुपयांचे बिल होते. अशा वेळी सरकारच्या सूचनेनुसार रुग्णाकडून धनादेश स्वीकारून त्याला घरी पाठवले व नंतर धनादेश वठला नाही, तर रुग्णालयांचे पैसे बुडू शकतात.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला रुग्णालयांचा ‘चेक’
By admin | Published: November 15, 2016 5:24 AM