नारायण चव्हाण,
सोलापूर - अल्पदरात दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी राज्यभरात आता सहकारी तत्त्वावर रुग्णालये उभारण्यात येणार असून, यासाठी सरकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्यांत सहकारी रुग्णालये उभी राहतील. राज्यात सध्या अश्विन-सोलापूर, हिरेमठ-बार्शी, सुश्रुषा-मुंबई अशी ३ सहकार आहेत़ प्रत्येक जिल्ह्यात सहकारी रुग्णालये उभारण्यासाठी सहकार विभागाने कंबर कसली आहे. उस्मानाबाद, कोल्हापूर, नांदेड या तीन जिल्ह्यात बैठकाही झाल्याची माहिती, सूत्रांनी दिली. अहमदनगर, औरंगाबाद येथील प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे़ रुग्णालये उभारण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सहकारी आणि धर्मादाय संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही सांगण्यात आले. >अशी असतील रुग्णालयेरुग्णालयात सामान्य व्यक्तींना भाग भांडवल घेऊन सभासद होता येईल़ रुग्णालयाच्या व्यवस्थापनात सभासद आणि डॉक्टर मंडळी यांचा सक्रिय सहभाग असेल़ सभासद भागभांडवल, शासकीय भागभांडवल, आर्थिक वर्षाअखेर सहकारी संस्थांच्या निव्वळ नफ्यात २० टक्क्यांपर्यंत धर्मादाय निधीची तरतूद करून रुग्णालयांना देणगी स्वरुपात आणि खासगी कंपन्यांना त्यांच्या ‘सीएसआर’फंडामधून खर्च करण्यासाठी आवाहन करून निधी उभारण्याचा संकल्प आहे़>गरीब रुग्णांसाठी सेवासोलापुरात आयोजित के लेल्या महाआरोग्य शिबिरात ३० हजारांहून अधिक रुग्ण आले़ त्यात बहुसंख्य गरीब होते़ सरकारी रुग्णालयात पुरेशा सेवा मिळत नाही आणि खासगी रुग्णालयाचे दर परवडत नाहीत़ त्यामुळे गरिबांना परवडणारी वैद्यकीय सेवा सहकारी रुग्णालयातून मिळावी हा हेतू समोर ठेवून काम हाती घेतले आहे़ - सुभाष देशमुख, मंत्री, सहकार व पणन