शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १२ वीपर्यंतच्या वर्गांचे वसतीगृह, आश्रमशाळा सोमवारपासून बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 10:49 PM

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या दोन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे.  त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागासह  शहापूर व मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील इयत्ता ५ वी ते १२ वीचे वर्गांसाठी केवळ आदिवासी विकास विभागाची सर्व वसतिगृहे व निवासी आश्रमशाळा, समाजकल्याण विभागाचे अधिपत्याखालील सर्व वसतिगृहे व निवासी शाळा २२ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी रात्री तडकाफडकी  जारी केले आहेत.

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या दोन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येवरील उपाययोजने अंतर्गत त्यांच्या अखत्यारीतील आश्रमशाळा, वसतीगृह पुढील आदेश होईपर्यंत सोमवारपासून बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे. या आदेशासह जिल्हाधिकाऱ्यांनी  इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहणे ऐच्छिक केले आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत चालू ठेवण्याचे त्यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे. 

ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगर परिषद कार्यक्षेत्र वगळून जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी तात्काळ आदेशाची अंमलबजावणी करण्याची तंबीही त्यांनी संबंधीत प्रशासनाला दिली आहे. याबाबतचे सर्व समन्वयन व संनियंत्रणासाठी आदिवासी विकास विभागासह समाजकल्याण, नगर पंचायत व जिल्हा परिषदेच्या  शिक्षण विभागाला जबाबदार धरण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम  व भारतीय दंड संहिता नुसार दंडनीय, कारयदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेSchoolशाळा