शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

गरम चाय की प्याली हो!

By admin | Published: February 05, 2017 1:13 AM

सकाळी उठल्या उठल्या आपल्याला दूध, चहा, कॉफी पिण्याची सवय असते. अनेक जण तर चहाच पितात. लोकांच्या चहाची आवड आणि आरोग्याचा विचार करून आता

- भक्ती सोमण सकाळी उठल्या उठल्या आपल्याला दूध, चहा, कॉफी पिण्याची सवय असते. अनेक जण तर चहाच पितात. लोकांच्या चहाची आवड आणि आरोग्याचा विचार करून आता वेगवेगळ्या चवीचे चहा मिळायला लागले आहेत. सकाळ कशी ताजीतवानी हवी. ब्रश करून झाल्यावर चहाचं आधण ठेवायचं. मग त्यात भरपूर किसलेलं आलं, साखर घालून उकळल्यावर चहा पावडर घालायची. छान उकळी आली की गॅस बंद करून थोड्या वेळाने तो चहा गाळायचा आणि कोऱ्या चहात आधीच तापलेलं दूध घालायचं. साखरेचा गोडवा, आल्याचा तिखटपणा आणि चहाची स्वत:ची चव याच्या मिश्रणाने तयार झालेला हा फक्कड चहा पिताना मजा येते. हा चहा पिऊन आपला दिनक्रम सुरू होतो. त्यानंतर मग दिवसभरात अनेकदा आपण वेगवेगळ्या ठिकाणी चहा पितो. प्रत्येक चहाचा रंग-ढंग वेगळाच असतो. टपरीवरच्या एक प्याली चायची मजा तर वेगळीच असते. तो चहा कसा करतात ते बघितलं की तो प्यावासाच वाटणार नाही. पण काचेच्या ग्लासातला त्या चहाचा घोट प्यायलावरच त्याची खरी मजा कळते. म्हणून तर सुटबुटवाल्यांनाही या चहाची भुरळ पडतेच पडते. असे हे चहापुराण कधीच न संपणारे आहे. असं म्हणतात की, २,७३७ वर्षांपूर्वी चीनचा सम्राट शैन नुंग यांनी उकळते पाणी गार करत ठेवले होते. तेव्हा काही पानं येऊन पडली. त्या पानांमुळे पाण्याला विशिष्ट असा रंग आला. अतिशय वेगळी असलेली ती चव सम्राटाला आवडली. तेव्हापासूनच चहाचा प्रसार सुरू झाला. सन ३५०ला चहा पिण्याचा पहिला उल्लेख तज्ज्ञांना सापडला. १६१०नंतर हळूहळू पाश्चात्त्य देशात चहाचा प्रसार व्हायला लागला. परदेशात तर चहा चांगलाच रूळला आहे. मात्र, भारताचा विचार करायचा झाल्यास, आसामच्या खास पत्तीयोसे बनलेल्या या चहाचा भारतात शोध लागला तो सन १८१५ला. आसाममधले स्थानिक कबाईली लोक चहाची पाने उकळून पितात हे इग्रजांच्या लक्षात आले. मध्ये बराच काळ गेला. त्यानंतर भारताचे गर्व्हनर जनरल लॉर्ड बॅटिक यांनी १८३४ साली भारतात चहाचे उत्पादन कसे करता येईल याबाबत एक समिती स्थापन केली. १८३५ साली आसाममध्ये चहाचे मळे सुरू झाले. त्यानंतर ब्रिटिशांनीच भारतीयांना चहा पिण्याची सवय लावली. अशा प्रकारे एवढ्या वर्षांच्या टप्प्यांत चहाने वेगवेगळ्या चवीत, ढंगात अनेकांना तृप्त केले. कित्येक लोक तर खूप आवडीने कमी दूध घालून चहा पिणे पसंत करतात. तर काही जण कोरा चहा पितात. कोऱ्या चहात पोषणतत्त्व अधिक प्रमाणात असतात. दूध घातल्याने ती तत्त्व कमी होतात. त्यामुळे कोरा चहा आवर्जून प्यावाच, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. याशिवाय सध्या ग्रीन टी प्रचंड लोकप्रिय असून, तो रोज पिणारेही कितीतरी लोक आहेत.जसजसा काळ बदलला तसतशा करण्याच्या पद्धतीही बदलत गेल्या आहेत. यात कमी जागेत विविध प्रकारचे चहा देत गल्लीवरच्या चहाच्या टपऱ्यांनी मोठ्या हॉटेल्सच्या तुलनेत आपलं अस्तित्व जपलं आहे यात शंकाच नाही. मुंबई उपनगरात तर लाखभर तरी अशा टपऱ्या असतीलच. लोकांना आवडत असलेला बदल जाणून घेत चहाचे वेगवेगळे फ्लेवर्स देणारी अनेक हॉटेल्स सुरू झाली आहेत. तेथे मसाला चायपासून हनी लेमन टी, आइस टी, हर्बल टी, ब्लॅक टी, पीच, मिंट, चॉकलेट असे गरम व गार असंख्य प्रकार आता मिळायला लागले आहेत. एकंदर काय तर, सकाळपासून संपूर्ण दिवस ताजा आणि समरसून जगायचा असेल तर चहावाचून पर्याय नाहीच! बरोबर ना!पद्घत बदलतेयचहा पिण्याच्या पद्धतीतही आता खूप बदल झाले आहेत. अगदी आत्ताआत्तापर्यंत आपण चहा पिताना बशीचा वापर करायचो. बशीतनं सुर्रर्र करीत चहा पिण्याची गंमत काही औरच असायची. पण लोकांच्या सवयी बदलल्याने बशी मिळणे आता दुरपास्तच झाले आहे. त्याऐवजी चहा पिण्यासाठी मग्ज, छोटे कप मिळतात. मातीच्या कपात, काचेच्या ग्लासात (टपरीवर मिळणारे ग्लास) चहा पिण्याचं प्रमाण वाढतं आहे. चवीबरोबरच चहा देण्याच्या पद्घती कशा वेगळ्या आहेत याकडेही आता लोकांचे चांगले लक्ष असते. या बदलाकडे आता चहा वळत आहे.