शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

हॉटेल, उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नये - मुख्यमंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 3:37 AM

नियम मोडणाऱ्या हॉटेल्स व उपाहारगृहे चालकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी पालिका आणि पोलीस प्रशासनाला दिल्या. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.

मुंंबई : मोठ्या प्रमाणावरील गर्दी आणि नियम न पाळल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे व कडक लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नये. हा शेवटचा इशारा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी स्पष्ट केले. (Hotels, restaurants should abide by the rules, should not be forced to do strict lockdown - Chief Minister's warning)आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेंटर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले. ‘गेल्या ४ महिन्यांत सर्व व्यवस्थित होते. आपल्याच राज्यात नव्हेतर, अगदी युरोपमध्येसुद्धा जणू काही कोरोना गेल्यासारखे सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरू झाले होते. मात्र, अचानक सर्वत्र संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.नियम मोडणाऱ्या हॉटेल्स व उपाहारगृहे चालकांवर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी पालिका आणि पोलीस प्रशासनाला दिल्या. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. हॉटेल्स संघटनांनी प्रत्येक प्रभागात त्यांची फिरती पथके तयार करून नियमांचे पालन होते आहे किंवा नाही, ते तपासावे. एक स्टार किंवा दोन स्टार तसेच लहान उपाहारगृहांत नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे, असे मुंबईचे महापालिका आयुक्त आय. एस. चहल म्हणाले.कोविड मार्शल्स हे मास्क न घालणाऱ्यांना दंड करतील. फूड कोर्टमध्येदेखील संख्या मर्यादित ठेवून, थर्मल इमेजिंग, संपर्काशिवाय पार्किंग याचेदेखील पालन केले जाईल, असा शब्द संघटनांनी दिला. कोरोना सरकला बंगले, सोसायट्यांकडे झोपडपट्ट्यांमधून बंगले, सोसायट्यांकडे कोरोना सरकला आहे. समाजातील या वर्गाचे एकमेकांना भेटणे, हॉटेलिंग, मॉल्समध्ये जाणे सुरू झाले आहे; त्यामुळे परिवारातील सर्व सदस्यांत एकदम फैलाव होत आहे. नियम न पाळणाऱ्यांकडून अधिक फैलाव होत आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांनी सावध केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस