House Between two States: सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात मोठा सीमावाद सुरू आहे. या वादादरम्यान महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्यांच्या सीमेवर असलेल्या एका घराचीही चर्चा होत आहे. चर्चेचे कारण म्हणजे, हे घर दोन राज्यांमध्ये विभागले गेले आहे. घराचा अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा भाग तेलंगाणात आहे.
पवार कुटुंबाचे घरदोन राज्यांमध्ये विभागलेल्या या घराचे स्वयंपाकघर तेलंगाणात तर बेडरूम आणि हॉल महाराष्ट्रात आहे. वाचून तुम्हाला वेगळं वाटेल, पण हे खरंय. तेलंगाणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर महाराजगुडा गाव असून, या गावात 10 खोल्यांचे घर आहे. या घरात पवार कुटुंबीय राहतात. या घराच्या चार खोल्या तेलंगाणात तर इतर चार महाराष्ट्रात आहेत.
अनेक दशकांपासून अशीच परिस्थितीया 10 खोल्यांच्या घरात उत्तम पवार आणि चंदू पवार अनेक वर्षांपासून राहतात. पवार कुटुंबात 13 सदस्य आहेत. 1969 मध्ये सीमावाद सुरू झाला आणि तेव्हापासून पवार यांचे घर आणि शेती दोन राज्यांमध्ये विभागली गेली. याबाबत उत्तम पवार म्हणाले की, आमचे घर दोन राज्यांमध्ये विभागले गेले आहे, पण आतापर्यंत यामुळे कोणताच वाद झाला नाही. पवार कुटुंब दोन्ही राज्यात प्रॉपर्टी टॅक्स भरतात. यामुळे त्यांना दोन्ही राज्यांच्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो.
14 गावांचा सीमावादANIच्या रिपोर्टनुसार, महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्याच्या सीमेवर वसलेल्या जीवती तहसील अंतर्गत येणाऱ्या 14 गावांचा वाद आहे. या 14 गावांमध्ये महाराजगुडा (Maharajguda village) देखील सामील आहे. हे गाव दोन राज्यांमध्ये विभागले गेले आहे. यातील अर्धा गावांवर महाराष्ट्राच तर अर्ध्या गावांवर तेलंगाणाचा अधिकार आहे.